Mumbai-Goa highway  Sakal
मुंबई

Mumbai-Goa highway : पहिल्या पावसानेच अवस्था दयनीय, मुंबई-गोवा महामार्गावर आज जनआक्रोश

सकाळ वृत्तसेवा

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गाचे अनेक ठिकाणी चौपदरीकरणाची कामे रखडलेली आहेत. अशातच पावसाला सुरूवात झाल्याने महामार्गावरील प्रवास जिकिराचा झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या कामांकडे प्रशासकीय यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी माणगावात महामार्ग जनआक्रोश समिती बस आगार ते प्रांताधिकारी कार्यालय अशी टाळ मृदूंगच्या गजरात पदयात्रा काढणार आहे.

पहिल्या पावसानेच मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था दयनीय झालेली आहे. या मार्गावरून प्रवास करताना कोणता प्रसंग कोणावर कधी चालून येईल, याची शाश्वती राहिलेली नाही. अपघातांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत.

गेल्या १३ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था असून ३३०० पेक्षा जास्त कोकणवासीयांना कायमचे अपंगत्व तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एखादा अपघात झालाच तर त्यातील जखमींना किंवा एखाद्या आजारी व्यक्तीला पुढील उपचारासाठी घेऊन जाताना अनेक अग्निदिव्य पार करावी लागली आहेत.

त्यामुळे प्रशासकीय अनास्थेविरोधात आंदोलनाचा इशारा देताना मंगळवारी (ता.४) सकाळी ११ वाजता माणगाव आगार ते प्रांताधिकारी कार्यालयावर टाळ-मृदंगाच्या गजरात मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे पदयात्रा काढून प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. तरी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे.

सर्व सुविधांनी सुसज्ज असा समृद्धी महामार्ग अवघ्या पाच वर्षात बनू शकतो. परंतु, मुंबई-गोवा महामार्ग गेली १३ वर्ष उलटून देखील अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोकणचा विकास खुंटला आहे. दळणवळणाची सुविधाच नसल्याने कोकणातील ग्रामीण भाग दिवसेंदिवस ओसाड होत चालला आहे.
- संतोष रणपिसे, जिल्हाध्यक्ष, मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती, रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"बियर्डलेस बॉयफ्रेंड की तमन्ना अब हमारे दिल में है"; खोटी दाढी लावून तरुणींची जोरदार घोषणाबाजी, आंदोलनाचा Video Viral

Nana Patole: शिर्डी विधानसभेच्या लोणी गावात 2,844 बोगस मतदार; पटोलेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

VIDEO : "...तर लॉरेन्स बिश्नोई आमचा हिरो!"; जैन मुनींचा वादग्रस्त व्हिडीओ तुफान व्हायरल

Savner Vidhan Sabha: सावनेर यंदा केदारांकडं राहणार की जाणार? कसं आहे सध्याचं समिकरण?

Latest Maharashtra News Updates Live : अजित पवारांना धक्का! राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT