मुंबई

पहिला पाऊस पडताच बाजारात मुठे, काळे खेकडे दाखल

CD

तुर्भे, ता ३(बातमीदार): पावसाची रिमझिम सुरू होताच बाजारात पिवळे मुठे आणि काळे खेकडे विक्रीसाठी दाखल होत असतात. नवी मुंबई शहरात आज तुरळक प्रमाणात हे खेकडे सापडत असले तरी उरण आणि ठाणे ग्रामीण भागातून शहरात विक्रीसाठी येत असून यांना खव्यांनाकडून अधिक मागणी असते. पिवळे मुठे १२० रूपये डझन तर काळे खेकडे ५०० रूपये डझन विक्री होत आहेत.

पावसाळा सुरू होताच निसर्ग डोंगर कपार आणि शेतावर हिरवी चादर ओढण्यास सुरुवात करतो. त्याच सोबतच अनेक आहार उपलब्ध करून देतो आणि त्यातीलच एक प्रकार म्हणजे पावसाळी खेकडे. या खेकड्याची खवय्ये वर्षभर वाट पाहत असतात. नवी मुंबई शहरातील नागरी आणि औद्योगिक वसाहत ही येथील शेतजमीन संपादित करून वसवली आहे. त्यामुळे या आधी येथील शेतात हमखास खेकडे उपलब्ध असायचे. मात्र आता शेती संपल्याने खेकडे नामशेष झाले, तर येथील डोंगर कपाऱ्यात थोड्या फार प्रमाणात आजही काळे खेकडे भेटतात त्यासाठी येथील निवडक आदिवासींना खूप मेहनत घ्यावी लागते. शहरात आज ही दोन्ही खेकडे भेटत नसले तरी येथील ग्रामस्थांच्या खाद्य संस्कृतीमधील एक अविभाज्य घटक आहे. त्यामूळे पावसाळ्यात येथील आगरी कोळी समाजातील घरा घरात बनवले जात असल्याने या खेकड्याची मागणी कायम आहे.


--
खेकड्याची आयात
आता अधिकांश खेकडे हे नवी मुंबई शहराबाहेरून उरण, ठाणे ग्रामीण भागातुन दाखल होत असून तुर्भे गाव, कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, शिरवणे आदी गावात अधिक प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होतात.

--
पूर्वी आमची शेती असताना आम्ही स्वतः पावसाली खेकडे पकडत होतो. आता शेती गेल्याने हे खेकडे इकडे भेटत नाही. मात्र हे खेकडे आमच्या खाद्य संस्कृतीतील भाग असल्याने प्रत्येक पावसाळ्यात आम्ही ते आवर्जून विकत घेऊन बनवतो.
- कविता म्हात्रे, गृहिणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT