मुंबई

घड्याळ्याची टीकटीक कळवा- मुंब्य्रातच

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पाय आधीच खोलात असताना अजित पवार यांच्या बंडानंतर घड्याळ्याची टीकटीक केवळ कळवा- मुंब्‍य्रापुरतीच सिमित राहण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ३४ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी हणमंत जगदाळे यांच्या चार जणांच्या पॅनेलने आधीच शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. शहरातील राबोडी परिसरातील अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नजीब मुल्ला यांनी आपली अधिकृत भुमिका अजूनही जाहीर केलेली नाही; परंतु रविवारपासून मुल्ला यांनी मुंबईतच तळ ठोकला आहे. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीच्या उर्वरित माजी नगरसेवकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धक्कातंत्र देत भाजपला साथ दिली आणि सत्तेत उपमुख्यमंत्री पद मिळवले. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा नव्याने घडामोडींना सुरुवात झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्हाही अपवाद नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी आधीच पक्षाला रामराम ठोकल्यामुळे भाजपचे बळ वाढले आहे. परिणामी ठाणे महापालिका वगळता कोणत्याही महापालिकांमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या नगण्य आहे. अशामध्ये राष्ट्रवादी फुटीचा सर्वाधिक परिणाम ठाण्यावर होण्याची चिन्ह आहेत. उलट अजित पवारांपेक्षा आमदार जितेंद्र आव्हाड यांना पक्षाध्यक्षांनी अधिक महत्त्व दिल्याने अनेक पदाधिकारी नाराज असल्याचे दिसते. यातूनच अजित पवार समर्थक नव्हे तर आव्हाड यांच्यावर नाराज असलेला एक मोठा गट बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याची झलक आनंद परांजपे यांच्या निमित्ताने पहायला मिळाली आहे. परांजपे आणि आव्हाड यांच्यामध्ये सर्वच अलबेल नव्हते. त्यामुळे संधी मिळताच आव्हाडांचे वर्चस्व खालसा करण्यासाठी आनंद परांजपे यांनी अजित पवार यांना साथ दिली. वास्तविक आव्हाडांमुळे परांजपे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले होते.

---------------
आव्हाडांचा करिश्मा कायम
सध्यातरी राष्ट्रवादीचे अस्तित्व केवळ कळवा-मुंब्य्रापुरतेच मर्यादित होत असल्याचे दिसते. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच हा मतदारसंघ असून पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक हे कळवा- मुंब्‍य्रातून निवडून येतात. त्यामुळे सत्तेची चावी अनेकवेळा कळवा-मुंब्य्राच्या हाती असते. माजी नगरसेवक राजन किणे यांनी मुंब्रा विकास आघाडी बनवली आहे; तर शिंदे गटानेही मिशन कळवा-मुंब्रा सुरू केले आहे. पण या दोन्ही शहरांमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांचाच दबदबा पहायला मिळत आहे. त्यामुळे घडाळ्याची टीक टीक कळवा- मुंब्रा इथपर्यंतच मर्यादित असली तरी वेळ येताच सत्तेचे आकडे बदलण्याची ताकद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT