मुंबई

शुक्रवारी एसएनडीडी विद्यापीठाचा स्थापना दिवस

CD

एसएनडीडी विद्यापीठाचा उद्या स्थापना दिवस

मुंबई, ता. ५ : देशात महिला शिक्षणाचा वारसा चालविणाऱ्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा (एसएनडीटी) १०८ वा स्थापना दिवस सोहळा शुक्रवारी, ७ जुलैला विद्यापीठाच्या चर्चगेट संकुलातील सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. या वेळी राज्यपालांचे एसएनडीटीच्या स्थापना दिवसानिमित्त अभिभाषण होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाने दिली.

प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्र-कुलगुरू प्रा. रुबी ओझा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विद्यापीठाला १०७ वर्षांत महिला शिक्षणाचा मोठा वारसा लाभला आहे. सध्या ५० हजारांहून जास्त विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या ३९ विभाग, १३ संस्था आणि २६९ संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या आणि ‘संस्कृता स्त्री पराशक्ती’ हे बोधवाक्य असलेल्या या विद्यापीठाचे शिक्षणातून महिला सक्षमीकरण हे ध्येय असल्याचे कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी सांगितले.
--------------------------
शिक्षक, महाविद्यालयांचा होणार सन्मान
विद्यापीठाच्या या स्थापना दिवसाच्या सोहळ्यात विद्यापीठातील अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महर्षी कर्वे उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार आणि सर्वोत्तम महाविद्यालय पुरस्कार देऊन राज्यपालांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. तसेच देश-विदेशातील माजी विद्यार्थिनींनाही या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Arrives: अखेर टीम इंडिया विजयी ट्रॉफीसह मायदेशी; दिल्ली विमानतळावर चाहत्यांची तुफान गर्दी

Raju Shetti : दुधाच्या बाजारभावाचा प्रश्न मार्गी लावा;राजू शेट्टी यांची मागणी,आंबेगाव तालुक्यात शेतकरी मेळावा

Government Recruitment : सरकारकडून ‘लाख’ मोलाची नोकरभरती;उपमुख्यमंत्री फडणवीस; एक लाख पदांचा विक्रम

Prithviraj Chavan : आर्थिक पाहणी अहवालातून राज्याची फसवणूक ;पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 जुलै 2024

SCROLL FOR NEXT