मुंबई

स्पर्धा परीक्षेच्या यशात कौटुंबिक सहकार्याचा सिंहाचा वाटा

CD

वाडा, ता. ६ (बातमीदार) ः स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशात पालकांनी दिलेले सकारात्मक प्रोत्साहन, कुटुंबातील सदस्यांनी केलेले सहकार्य याचा सिंहाचा वाटा असतो, असे प्रतिपादन आयएएस डॉ. कश्मिरा संखे यांनी चिंचघर येथे बोलताना केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२२ मध्ये घेतलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम व देशातून ५२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या डॉ. कश्मिरा किशोर संखे यांचा नागरी सत्कार वाडा तालुक्यातील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या सत्कार समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन करताना डॉ. कश्मिरा संखे यांनी त्यांना आलेल्या विविध अनुभवांतून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा, विद्यार्थ्यांनी कोणत्या चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात, वाईट सवयींचा कसा त्याग करावा, नेहमी सकारात्मक विचार करावा, सोशल मीडियापासून दूर राहावे, असा मोलाचा सल्ला दिला. तसेच पालकांनी त्यांना दिलेले प्रोत्साहन, कुटुंबातील विविध सदस्यांनी केलेले सहकार्य या सर्व गोष्टींचा त्यांच्या यशामध्ये सिंहाचा वाटा होता, असेही सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष देवदत्त राजोपाध्ये यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे हे विद्यार्थ्यांचे अंतिम ध्येय नसून एक चांगला अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे देशाची सेवा करणे, निःस्वार्थपणे जनतेची कामे करणे, राष्ट्राच्या विकासात आपले योगदान देणे हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आपली वाटचाल केली पाहिजे. कुणाच्या तरी दबावाखाली लोकांची कामे करणे, अथवा न करणे हे चांगल्या अधिकाऱ्यांचे लक्षण नाही. अधिकाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने व निःस्वार्थ भावनेने जनतेची कामे करावीत. चांगल्या कामातून अधिकारी स्वतःला सिद्ध करत असतो. चांगल्या अधिकाऱ्यांची लक्षणे काय असावीत, हे त्यांनी विविध उदाहरणांतून त्यांना पटवून दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्ह्यातील विटा येथे मागील चार दशके स्पर्धा परीक्षा चळवळ चालविणारे तज्‍ज्ञ मार्गदर्शक देवदत्त राजोपाध्ये उपस्‍थित होते; तर मुख्य अतिथी म्हणून पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, महावितरणचे कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, वाडा पोलिस निरीक्षक सुरेश कदम, मानव विद्या मिशनचे समुपदेशक डॉ. किशोर संखे, टीडीसीसी बँकेचे माजी सीईओ भगीरथ भोईर, चिंचघर ग्रामपंचायत सरपंच प्रेमा नांगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT