मुंबई

आंबोली करंजविरामधील धोकादायक पुलाची दुरूस्ती

CD

कासा, ता. ६ (बातमीदार) ः आंबोली करंजविरा येथील पुलाला भेगा पडल्‍याने वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली होती. तसेच एखादी दुर्घटना घडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. याप्रकरणी माजी आमदार अमित घोडा यांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली होती. त्‍यानंतर बांधकाम विभागाकडून या पुलाची डागडुजी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत डहाणू, तलासरी तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या जोरदार पावसाने आंबोली करंजविरा पुलाचा काही भाग खचल्याने भेगा पडून तो धोकादायक झाला होता. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. हा पूल डहाणूहून तलासरीकडे जाणाऱ्या मार्गावर असून या रस्‍त्‍यावरून मोठी वाहतूक असते. त्यात सध्या सुरू असलेल्‍या जोरदार पावसाने पुलाला भेगा पडल्या होत्या. त्‍यामुळे दुर्घटना होण्याची भीती व्‍यक्‍त करण्यात येत हेाती. या पुलावर भेगा पडल्याची माहिती माजी आमदार अमित घोडा यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित दुरुस्तीची मागणी केली होती. त्यामुळे बांधकाम विभागाने या पुलाची दुरुस्ती केली.
........................
प्रतिक्रीया
या पुलाच्या एका बाजूस भेगा पडल्या होत्‍या. त्‍यामुळे विभागाकडून त्वरित त्या पुलाची पाहणी करून ठेकेदाराकडून त्‍याची डागडुजी केली आहे.
- मनीष चकदरे, अभियंता, बांधकाम विभाग डहाणू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT