मुंबई

भरपावसात गोरेगावात पाणी टंचाई

CD

मालाड, ता. ६ (बातमीदार) ः जलवाहिनीच्या गळतीमुळे भरपावसात गोरेगाव पूर्वेतील गोगटेवाडीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
गोरेगाव पूर्व येथील गोगटेवाडीत गेल्या १२ दिवसांपासून जलवाहिनीमधून दररोज पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्यामुळे गोगटेवाडीतील लक्ष्मी चाळ तसेच आजूबाजूच्या परिसरात फार कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे.
या ठिकाणी काही महिन्यांपासून नवीन जलवाहिनी बसवण्याचे काम सुरू आहे. अशात पाण्याची हजारो लिटर गळती ही जुन्या मुख्य जलवाहिनीमधून होत असल्याने याबाबत पालिकेच्या पी दक्षिण जलखाते विभागातील निधी खडसे यांना ही पाणीगळती बंद करण्याबाबत अनेकदा सांगण्यात आले होते, परंतु अद्याप त्‍यावर कारवाई झाली नसल्‍याचे स्‍थानिकांचे म्‍हणणे आहे. येथील पाणीगळतीच्या नागरिकांच्या तक्रारींकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत असल्याची माहिती तक्रार स्वरूपात पी दक्षिण विभाग जलखाते सहायक अभियंता तसेच सहायक आयुक्त यांना दिली असल्‍याचे स्‍थानिकांनी सांगितले.

आम्हाला अद्याप गोगटे वाडीतील पाणी समस्येबाबत तक्रार मिळालेली नाही. तक्रार मिळाली की त्वरित कारवाई करू.
- बी. जे. पाटील, सहायक अभियंता जलकामे, पी-दक्षिण विभाग

पालिकेचे आमच्या समस्येकडे लक्ष नाही. एकीकडे पावसाचे पाणी साठत असताना आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
- सुलोचना बेर्डे, स्थानिक रहिवासी

जवळपास दीड ते दोन हजारची लोकवस्ती आहे. या ठिकाणी केलेल्या खोदकामामुळे रहिवाशांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागते. पाणी समस्‍येकडेही प्रशासनाचे लक्ष नाही.
- उत्कर्ष बोरले, सामाजिक कार्यकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT