मुंबई

मेट्रोच्या कामांना गती

CD

मेट्रोच्या कामांना गती
सहा मार्गांसाठी ७६ टक्के खांब उभारणी पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः मुंबई महानगरात मेट्रोचे जाळे उभारून मुंबईकरांसाठी प्रभावी वाहतूक सेवा उभारण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. या कामांनी गती पकडल्‍याचे पाहायला मिळत आहे. निर्माणाधीन असलेल्या मेट्रो प्रकल्पांमध्ये ३६०३ खांब उभारले गेले आहेत. मेट्रो मार्गिका ठराविक वेळेत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएची टीम प्रयत्नशील आहे. सहा मुंबई मेट्रो मार्गांसाठी एकूण ४९२९ मेट्रोचे खांब उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी जवळपास ७३ टक्के खांबांची उभारणी आता यशस्वीरीत्या पूर्ण झाली असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.
मुंबईसारख्या गजबजलेल्या मार्गांवर पूर्वनिर्मित घटक वेगवेगळ्या कास्टिंग यार्ड्सवर तयार करून बांधकाम स्थानावर नेले जातात. ३५० ते ५०० मेट्रिक टन क्षमतेसह क्रेन वापरून उभारले जातात. त्यामुळे महामार्गावरील तसेच सार्वजनिक वाहतुकीतील व्यत्यय कमी करून सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मेट्रोचे बहुतांश बांधकाम रात्रीच्या वेळी करण्यात येत असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली.

प्रकल्‍पाची सद्यस्थिती
मेट्रो मार्ग प्रगती पूर्ण झालेले खांब
मेट्रो मार्ग २ ब
(डीएन नगर ते मंडाले) ५०.७ टक्‍के ११०९ पैकी ६१४

मेट्रो मार्ग ४
(वडाळा ते कासारवडवली) ५५ टक्‍के १४७६ पैकी ९७३

मेट्रो मार्ग ४ अ
(कासारवडवली ते गायमुख) ५८.०८ टक्‍के २२१ पैकी १४३

मेट्रो मार्ग ५ टप्पा १
(ठाणे ते भिवंडी) ७८.४ टक्‍के ४६४ पैकी ४४०

मेट्रो मार्ग ६
(स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) ७०.७५ टक्‍के ७६९ पैकी ६५७

मेट्रो मार्ग ९
(दहिसर ते मिरा भाईंदर) ६१.२८ टक्के ९०० पैकी ७७६

उपनगरीय रेल्वे आणि बस सेवा यांच्यावरील ताण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशातील सर्व मेट्रो कॉरिडॉर शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य देत आहे. नुकतेच उद्घाटन झालेले मेट्रो मार्ग २ अ आणि ७ हे मार्ग लाखो प्रवाशांना दिलासा देत आहेत. एमएमआरडीए सध्या गायमुख ते शिवाजी चौक (मिरा रोड) दरम्यान मेट्रो मार्ग १० साठी विविध परवानग्या मिळविण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. याव्यतिरिक्त, मेट्रो मार्ग १२ (कल्याण तळोजा) साठी सामान्य सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे आणि स्थापत्य कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT