मुंबई

उल्हासनगरात गटारावरील स्लॅब कोसळले

CD

उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : शहरातील एका गटारावरील स्लॅब कोसळल्याने त्या ठिकाणी भले मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे गटारात अनेक जण पडून दुर्घटना घडत आहेत. ॲड. चरण पेंथालिया यांचे कार्यालय हे कॅम्प नंबर ५ मधील कैलास कॉलनी स्मशानभूमीसमोर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यालयासमोरील स्लॅब कोसळल्याने तिथे भगदाड पडले. विशेष म्हणजे कार्यालयाचा दरवाजा हा पडलेल्या भगदाडासमोरच असल्याने ये-जा करण्यासाठी तोकड्या जागेचा आधार घ्यावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात घसरण होत असल्याने अनेकदा या तोकड्या जागेवरून जाताना वकील, क्लायंट पडत असून तक्रार केल्यावरही पालिकेकडून कार्यवाही होत नसल्याची माहिती पेंथालिया यांनी दिली. यासंदर्भात पालिकेचे शहर अभियंता संदीप जाधव, उपअभियंता तरुण सेवकानी यांच्याशी संपर्क साधला असता शुक्रवारी कर्मचाऱ्यांना पाठवून पडलेल्या स्लॅबची पाहणी करून लवकरात लवकर कामाची सुरुवात करण्यात येणार असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT