मुंबई

पुनर्रोपणाच्या नावाखाली झाडांची कत्तल

CD

मुंबई, ता. ६ ः मुंबई मेट्रोतर्फे पुनर्रोपित करण्यात आलेली ६४ टक्के झाडे काळजी न घेतल्याने मृत झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. परिणामी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून झाडांची पुनर्रोपण प्रक्रिया शास्त्रीय पद्धतीने केली जात नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एखादे झाड पुनर्रोपित करण्याची प्रक्रिया कठीण असून त्यासाठी योग्य देखरेख करणारी यंत्रणा मुंबई मेट्रोकडे नाही का, असा सवालही पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे. वृक्षप्रेमींनी मेट्रोच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ मेट्रो ३ मार्गिकेचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुरू असून ती सुरुवातीपासूनच वृक्षतोडीमुळे वादाचे कारण ठरली आहे. अशातच आता पुन्हा एकदा माहिती अधिकारातून उघड झालेल्या माहितीमुळे पर्यावरणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. मेट्रो ३ च्या कामांतर्गत पुनर्रोपित करण्यात आलेली ६६५ पैकी केवळ २३१ झाडे जगली; तर ४३४ झाडे मेली. आरे वसाहतीसह इतर भागांत पुनर्रोपित करण्यात आलेल्या झाडांबाबतचा अहवाल वॉचडॉग फाऊंडेशनचे निकोलस अल्मेडा यांनी मागवला होता. त्याबाबत मुंबई मेट्रोकडून आलेल्या माहितीतून धक्कादायक परिस्थिती समोर आली.

अशा पद्धतीने होते वृक्षांचे पुनर्रोपण
- एखाद्या प्रकल्पाच्या ठिकाणची झाडे तोडण्यास मनाई किंवा पर्यावरणप्रेमींचा विरोध असेल तर तेथील वृक्षांचे पुनर्रोपण केले जाते. ते करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे.
- लिफ्ट ॲण्ड शिफ्ट म्हणजे क्रेनच्या साह्याने एखादे झाड मुळापासून काढून काही अंतरावरच दुसऱ्या खड्ड्यात पुनर्रोपित केले जाते. अशा वेळी किमान ८० टक्के मुळे झाडांना असणे गरजेचे आहे.
- झाड शास्त्रीय पद्धतीने तज्ज्ञांच्या देखरेखीतच जमिनीतून काढले जाते. पुनर्रोपित करतानाही मूळ घट्ट होण्यासाठी नियमित देखभाल आणि खतांचा पुरवठा करणे आवश्यक आहे; मात्र अनेकदा अशी खर्चिक आणि वेळखाऊ पद्धत समजून त्याची अंमलबजावणी न झाल्यास झाडे काही दिवसांतच मरतात.

झाड म्हणजे एक जीव आहे. विकासकामे जीवघेणी ठरत आहेत. झाडे जमिनीतून चुकीच्या पद्धतीने काढली जात असल्याने काही दिवसांत ती मरतात. वृक्ष प्राधिकरणाचे कर्माचारीही झाडांच्या पुनर्रोपणावेळी तिथे नसतात. मेट्रोच्या कारभारामुळे अनेक झाडे मरत आहेत.
- निकोलस अल्मेडा, वॉचडॉग फाऊंडेशन

वृक्षतोड करण्याला विरोध होतो म्हणून त्यांचे पुनर्रोपण करण्याची प्रक्रिया आहे; मात्र झाडांची देखभाल आणि देखरेख करण्याची जबाबदारी मुंबई मेट्रो पार पाडत नसल्याचे दिसते. त्याचेच हे परिणाम आहेत.
- देबी गोयंका, पर्यावरणतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT