मुंबई

जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे बडतर्फ

CD

उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना बडतर्फ केल्याचा आदेश आयुक्त अजीज शेख यांनी जारी केला आहे. उल्हासनगर महापालिकेत जनसंपर्क अधिकारी पदाची नोकरी मिळवण्यासाठी मूळ जन्म प्रमाणपत्रात फेरफार करून बनावट जन्म दाखला सादर केल्याचा दोषारोप सिद्ध झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक व ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी चिकाटीने पाच वर्षे दिलेल्या लढ्याला अखेर यश लाभले आहे. युवराज भदाणे यांची मूळ जन्म तारीख ही १ जून १९७० असताना त्यांनी पालिकेत नोकरी मिळवण्यासाठी जन्म दाखल्यात १ जून १९७२ असा फेरफार करून त्याद्वारे उल्हासनगर महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकारी ही सरकारी नोकरी मिळवली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक व अन्यायविरोधी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मालवणकर यांना हा प्रकार समजताच त्यांनी २०१८ पासून पालिकेकडे युवराज भदाणे यांची तक्रार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी अनेक आंदोलने केल्यावर पालिकेने चौकशी समिती स्थापन केली होती. भदाणे यांच्याविरोधात पाच दोषारोप सिद्ध होत असल्याचा अहवाल सादर झाल्यानंतर पालिका आयुक्त शेख यांनी युवराज भदाणे यांना बडतर्फ केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT