मुंबई

- सीएसटीएममधील हेरीटेज रेल्वे इंजीन्स लोणावळ्यात शिफ्ट होणार !

CD

‘हेरिटेज गल्‍ली’ आता लोणावळ्यात
सीएसएमटीच्या पूर्ण विकासामुळे मध्य रेल्‍वेचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा असणाऱ्या सीएसएमटी स्थानकांतील फलाट क्रमांक अठरावर असलेली ‘हेरिटेज गल्ली’ आता लोणावळ्यात हलवण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकांच्या पुनर्विकासामुळे मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चेकंपनीपासून तर थोरामोठ्याचे आकर्षण असलेल्‍या रेल्वेच्या ‘हेरिटेज गल्ली’ला भेट देण्यासाठी लोणावळा गाठावे लागणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १८ जवळील मोकळ्या जागेत हेरिटेज गल्‍ली मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आली होती. या हेरिटेज गल्लीत ब्रिटिशकालीन वाफेवर चालणारी क्रेन, स्टोन क्रशर मशीन, पहिले इलेक्ट्रिक इंजिन, हॅण्ड ट्यूब फायर इंजिन, काँक्रीट मिक्सर, प्रींटिंग प्रेस मशीन अशा ऐतिहासिक मशिनरी ठेवण्यात आल्‍या आहेत. या ‘हेरिटेज गल्ली’ला दररोज शेकडो पर्यटक भेट देत होते. मात्र, आता अहलुवालिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सीएसएमटी स्थानकांचे पुनर्विकास काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘हेरिटेज गल्ली’ लोणावळ्यात स्थलांतरित केली जाणार. त्यासाठी किमान दोन महिने लागतील. कारण इंजिन आणि इतर वस्तू ठेवण्यासाठी सुरक्षित जागा तयार करावी लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली आहे.

काय आहे हेरिटेज गल्ली
मुंबईला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या समोर भारतीय रेल्वेचा इतिहास उलगडावा, भारतीय दळणवळणातील टप्पे त्यांना अभ्यासात यावेत, यासाठी २०१० साली सीएसटी रेल्वे स्थानकात हेरीटेज गल्ली सुरू करण्यात आली आहे. या हेरिटेज गल्लीत ब्रिटिशकालीन वाफेवर चालणारी क्रेन, स्टोन क्रशर मशीन, पहिले इलेक्ट्रिक इंजिन, हॅण्ड ट्यूब फायर इंजिन, काँक्रीट मिक्सर, प्रिंटिंग प्रेस मशीन पर्यटकांसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

असा होणार पुनर्विकास
विमानतळाच्या धर्तीवर सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे. सीएसएमटी स्थानकाची भव्य हेरिटेज वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे. फलाट क्रमांक १८ मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफे टेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे. स्थानकात प्रवाशांसाठी प्लाझा, रिटेल, कॅफेटेरिया, करमणूक सुविधा असतील. फूड कोर्ट, वेटिंग लाउंज, स्थानिक उत्पादनांसाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. मेट्रो, बस वाहतुकीचे केंद्रीकरण करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT