मुंबई

बंदीच्या चौकटीत पर्यटनस्थळे !

CD

वसंत जाधव, नवीन पनवेल
पनवेल परिसरातील पर्यटनस्थळे ऐन पावसाळ्यातच बंद ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणांमध्ये पांडव कडा, गाढेश्वर, मोरबे यांचा समावेश असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत असून नयनरम्य ठिकाणे बंदीच्या चौकटीत अडकली आहेत. मुंबईचे प्रवेशद्वार असलेला पनवेल परिसर औद्योगिकीकरणाबरोबरच नागरीकरणातही झपाट्याने वाढत आहे. मुंबई, नवी मुंबई नंतर पनवेल परिसराला राहण्याकरता पसंती दिली जात आहे. या कारणाने लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सिमेंटची जंगले उभे राहताना येथील हिरवाई कमी झाली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी, अद्यापही दुर्गम आणि डोंगराळ भाग पनवेल तालुक्यात अस्तित्वात आहे. याठिकाणी वनराईही मोठ्या प्रमाणात आहे, तसेच पावसाचे प्रमाणही जास्त आहे.
-----------------------------------
निसर्गाने नटलेला पांडवकडा
खारघरच्या बाजूला पांडवकडा हा नैसर्गिक धबधबा आहे. येथील डोंगररांगांतून अतिशय वेगाने पाणी खाली पडते. हे दृश्य अतिशय मनमोहक असल्याने येथे पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईहून पर्यटक येतात. उंचीवरून खाली पडणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशी येथे मोठी गर्दी होते. लोणावळा, खंडाळा, नाणे घाटाला पर्याय म्हणून पांडवकड्याकडे पाहिले जाते; परंतु या भागात पाण्याच्या प्रवाहाचा अचानक वेग असल्याने अनेकदा पर्यटकांच्या जीवावरही बेतले आहे.
-----------------------------------
आकर्षणाचे केंद्र गाढेश्वर
गाढेश्वर येथील परिस्थिती काही वेगळी नाही. माथेरानच्या पायथ्याशी असलेले गाढेश्वर येथेही पर्यटकांची गर्दी असते. पाण्यात मनसोक्त भिजण्याची मजा लुटणारे कित्येक पर्यटक या ठिकाणी येण्यास उत्सुक असतात; परंतु अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने येथे मागील काही वर्षांत पर्यटकांचा जीव गेल्याची नोंद आहे. या कारणाने गाढेश्वर परिसरातही पर्यटकांना येण्यास मनाई केली आहे.
---------------------------------------
विस्तीर्ण जलाशयाचे मोरबे धरण
शिरवली परिसरात मोरबे धरण आहे. हा जलाशय डोंगराच्या सान्निध्यात आहे. या कारणाने पावसाळी पिकनिक करता येथे गर्दी पाहावयास मिळते. येथेही प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या तीनही ठिकाणी पावसाळी पर्यटन बंद करण्यात आले आहे.
--------------------------------------------
सुरक्षेच्या उपाययोजना कागदावरच
पांडवकडा परिसरात बंदीऐवजी सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रशासनाने भर द्यावा, अशी मागणी खारघर विकास समितीच्यावतीने भूषण म्हात्रे यांनी केली होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी याकामी पुढाकार घेतला होता. त्यानुसार पांडवकडा परिसरात ज्या ठिकाणी धोकादायक आहेत, त्याठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात येणार होती. तसेच इतरही उपाययोजना सिडकोच्या माध्यमातून केल्या जाणार होत्या. या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता; परंतु अद्याप अंमलबजावणी झाली नाही.
------------------------------------------------
विकेंडला वाहतूक कोंडीचा त्रास
सुट्टीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात पावसाळी पर्यटनासाठी अनेकजण घराबाहेर पडतात. त्यामुळे खारघर ते कळंबोली सर्कल, जुना पुणे रोड, नवीन पनवेल, आदई-सर्कल, सुकापूर, नेरे रोड, मोरबे रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. पनवेल तालुक्यातील पर्यटन स्थळे बंद असल्याने हा सर्व वाहनांचा लोंढा लोणावळा, खंडाळा, नानेघाट, खोपोलीकडे वळतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
़़़़-------------------------------------------
पावसाळी पर्यटनस्थळांच्या विकासाबाबतीत महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. सरसकट बंदी घातलेल्या पावसाळी पर्यटन स्थळांपैकी अति धोकादायक स्थळे वगळून इतर ठिकाणी सुरक्षित पर्यटन करण्यासंदर्भात सुट द्यावी, या संदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले जाणार आहे.
-प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल
------------------------------------------------
़पांडवकडा हा परिसर पालिका क्षेत्राच्या बाहेर आहे. हा परिसर वन विभागाचा असून असून सिडकोच्या अख्यत्यारित आहे. वन विभागाच्या संमतीशिवाय या ठिकाणी सिडको सुविधा देऊ शकत नाही. त्यामुळेच जिविताला धोका असलेल्या या ठिकाणी जाणे धोकादायक आहे.
-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका
------------------------------------
पनवेल आणि परिसरात निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. परंतु बंदीमुळे या ठिकाणीच्या निसर्गाचा आनंद पर्यटकांना लुटता येत नाही. ज्या ठिकाणी धोके आहेत, त्या ठिकाणी प्रशासनाने बंदी घालावी. तसेच ज्या ठिकाणी धोके नाहीत, अशा ठिकाणी उपाययोजना करून पर्यटनाला वाव द्यावा.
- धनंजय पाटील, निसर्ग मित्र, पनवेल
-----------------------------------
धावपळीच्या जीवनात विरंगुळा म्हणून पनवेल व नवी मुंबई परिसरातील नागरिक जवळपासची पर्यटन स्थळे म्हणून पांडवकडा, गाढेश्वर आणि मोरबे या ठिकाणांना भेटी देतात. या परिसरात बंदीऐवजी सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रशासनाने भर द्यावा. जेणेकरून पर्यटनाला वाव मिळेल.
- अॅड. देवेंद्र बोडरे, पनवेलकर
---------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT