मुंबई

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

CD

खारघर, ता. ८ (बातमीदार) : तलावात बुडून २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये शनिवारी (ता. ८) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. सिराजुद्दीन खान असे मृत तरुणाचे नाव आहे. खारघरमधील तळोजा कारागृहासमोर असलेल्या तलावात ही घटना घडली.
तळोजा वसाहतीत वास्तव्यास असलेला सिराजुद्दीन हा शनिवारी आपला भाऊ व इतर नातेवाईकांसमवेत तळोजा मध्यवर्ती कारागृहालगत असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी पावसाचा आनंद घेण्यासाठी गेला होता. दरम्यान, कारागृहासमोर असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. या वेळी त्याच्या भावाने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याला पोहता येत नव्हते. तसेच त्याचे आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ही माहिती खारघर पोलिस आणि अग्निशमन जवानांना दिल्यानंतर त्यांनी शोध घेतला.
पावसाळ्यात खारघर डोंगरावरून पाझरणाऱ्या पाण्याचे झरे निर्माण होऊन पांडवकडा, ओवे कॅम्प धरण तसेच फणसवाडी, चाफेवाडी परिसरात धबधबे तयार होतात. धबधबा तसेच तलावात पर्यटकांना खोल पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे पर्यटक जखमी अथवा बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षिततेची जबाबदारी म्हणून खारघर पोलिस आणि वन विभागाकडून पर्यटकांना मनाई करण्यात आली असून तसे फलकदेखील लावण्यात आले आहेत. तसेच पांडवकडा आणि ओवे तलावाच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले होते. मात्र कारागृहासमोरील तलाव या ठिकाणी पोलिस तैनात नसल्यामुळे ही घटना घडल्याचे पर्यटकांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT