मुंबई

उघड्या मॅनहोलचा पावसाळ्यात धोका कायम!

CD

मुंबई, ता. ८ ः मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मॅनहोलवर स्टेनलेस स्टीलच्या जाळ्या टप्प्याटप्प्याने बसवणार असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, त्या टाकण्याचे काम पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट उजाडणार आहे. परिणामी यंदाच्या पावसाळ्यात उघड्या मॅनहोलचा धोका कायम आहे.

बॉम्बे रुग्णालयाचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा ऑगस्ट २०१७ मध्ये परळमधील उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला होता. प्रश्न दरवर्षी पावसाळ्यात त्याबाबतचा प्रश्न चर्चेसाठी येतो आणि पाऊस संपताच सगळ्याचा विसर पडतो, असा अनुभव आहे. १५ दिवसांत दोन वेळा उघड्या मॅनहोलचा प्रश्न उच्च न्यायालयात चर्चेत आला.‌ उघड्या मॅनहोलमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर उघड्या मॅनहोलचा प्रश्न पालिकेने गांभीर्याने घेतला असून संरक्षित जाळ्या बसवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेनलेस स्टीलच्या जाळ्यांच्या प्रतिकृतीसाठी पालिकेच्या अभियंत्यांनी तंत्रज्ञान निश्चित केले आहे; परंतु त्या बसवण्यास पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. त्यामुळे मॅनहोल सुरक्षित जाळ्यांनी झाकण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडणार आहे.

मुंबईत एक लाखांहून अधिक उघडी मॅनहोल आहेत. फक्त साडेचार हजार मॅनहोलवर संरक्षित जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे फ्लडिंग पॉईंट्सवर असलेली उघडी मॅनहोल मुंबईकरांसाठी धोकादायक ठरू शकतात, असे मत मुंबईकर व्यक्त करत आहेत.

एकूण एक लाख मॅनहोल

पर्जन्य जलवाहिन्या विभाग
- एकूण मॅनहोल ः २५,६००
- संरक्षक जाळ्या बसवल्या ः २,४००

मलनिस्सारण विभाग
- शहर ः २७,०७८
- पूर्व उपनगर ः १५,९८३
- पश्चिम उपनगर ः ३१,६२१

- एकूण मॅनहोल ः ७४,६८२
- संरक्षक जाळ्या बसवल्या ः १,९००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT