मुंबई

नेत्‍यांसह कार्यकर्त्यांची कोंडी

CD

कर्जत, ता. ९ (बातमीदार) ः वर्षभरापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन, महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावून राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे डबल इंजिनचे सरकार सत्तेवर आले. त्‍यानंतर खरी शिवसेना कोणाची, यावर काही महिने वाद झाल्‍यावर प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत गेले. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता सरकार कुठे तरी स्थिरावले असतानाच पुन्हा मोठा राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक मोठा गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाला. ज्या अजित पवारांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शिंदे गटाने शिवसेनेत बंड केले, त्यांच्या नशिबी पुन्हा तोच प्रसंग आल्याने आमदारांमध्ये तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. नेत्यासहित कार्यकर्त्यांचीही कोंडी झाल्‍याचे राज्यासह कर्जत विधानसभा मतदार संघात पाहायला मिळते आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्याने वर्षभरापूर्वी जी अवस्था शिंदे गटाची झाली होती, आता तशीच काहीशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची आज झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहावयास मिळते आहे. नेत्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या मनात कोणता झेंडा घेऊ हाती, अशी संभ्रमावस्‍था निर्माण झाली आहे. कोणीही नेता खुल्या मनाने बोलण्याच्या मनःस्थितीत नसल्याने कार्यकर्त्यांनीही आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे.
राष्‍ट्रवादीकडून तीन वेळा निवडून आलेले माजी आमदार सुरेश लाड यांचे या आधीच तटकरेंशी संबंध दुरावल्याने राष्ट्रवादीपासून त्‍यांनी फारकत घेतल्याचे मागील काळात दिसून आले तर दुसरीकडे दुसऱ्या फळीतील नेते सुधाकर घारे यांची तटकरेंशी वाढलेली जवळीक तसेच घारे यांना देण्यात येणारे बळ पाहता आगामी विधानसभेचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून घारे यांच्याकडे पाहिले जात होते. घारे यांनीही तशी मोट बांधायला सुरवात केली होती. मात्र आता अचानक राष्‍ट्रवादीतच दोन गट पडल्याने त्यांच्यासमोरही मोठा प्रश्न पडला आहे.
सुरेश लाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. त्‍यांचे पुतणे व कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी सुरेश लाड हे शरद पवार यांच्यासोबतच असणार त्यामुळे आमचेही समर्थन त्‍यांनाच असल्‍याची भूमिका स्‍पष्‍ट केली.

मसूरकरांचा पाठिंबा कुणाला?
खोपोलीतील राष्ट्रवादीचे मुरब्बी नेते माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांनी, मुंबईहून पुण्याला जाताना सावरोली टोल नाक्यावर शरद पवारांच्या गाड्यांचा ताफा आला असता, त्‍यांना पुष्पगुच्छ देत आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्‍यामुळे खोपोलीतील त्यांचे समर्थक, अनेक माजी नगरसेवक व कार्यकर्ते शरद पवार यांच्या गटात जातील, असेही चित्र निर्माण झाले होते, त्‍यानंतर आदिती तटकरे मंत्री होऊन खोपोलीत आल्या तेव्हा मसूरकरांनी त्यांचीही भेट घेऊन स्वागत केले. त्यामुळे नक्की कोणाला पाठिंबा, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

मतदारांत चर्चांना उधाण
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही नवीन आघाडी कायम राहिली तर आगामी विधानसभेची उमेदवारी नक्की कोणत्या पक्षाला मिळणार, हे एक कोडेच आहे. शक्यतो विद्यमान आमदारांलाच उमेदवारी दिली जाते. या निकषाप्रमाणे आमदार महेंद्र थोरवे यांचा मार्ग मोकळा होईल. मात्र त्याच वेळेस राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी पाहिलेल्या उमेदवारीच्या स्वप्नांचे काय होणार, अशी चर्चा जनमानसात आहे. एकंदरच नवीन ट्रिपल इंजिन सरकार गाडी रुळावर आणते की आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधीच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे डबे रुळावरून घसरता, हे पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT