मुंबई

नवी मुंबई महापालिकेत व्यापक प्रमाणात बदल्या आणि पदस्थापना

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : अनेक वर्षे एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्या आणि एकाच पदावर असणाऱ्या तब्बल ३०९ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला. नवी मुंबईचा नावलौकिक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर होत असताना नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधा गुणवत्तापूर्ण असण्याकडे विशेष दिले जात आहे.
या अनुषंगाने आज विविध विभागातील तब्बल १५० अधिकारी, कर्मचारी यांच्या पदोन्नतीनंतर त्यांना पदस्थापना देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विभागांच्या कार्यप्रणालीमध्ये सूसुत्रता येण्याच्या दृष्टीने अनेक वर्ष एका विभागात कार्यरत असलेल्या १५९ अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. अशाप्रकारे तब्बल ३०९ अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यापर स्वरूपातील बदलीचा व पदस्थापनेचा हा महत्वापूर्ण निर्णय महापालिकेच्या कामकाजाला गतीमानता देणारा आहे. यात पदोन्नतीस पात्र ६ सहाय्यक आयुक्त, १५ प्रशाकिय अधिकारी, ३० अधिक्षक/वसूली अधिकारी, ९१ वरिष्ठ लिपिक/कर निरीक्षक, १ लेखाधिकारी, ७ सहाय्यक लेखाधिकारी अशा १५० इतक्या मोठ्या संख्येने कर्मचा-यांना पदोन्नतीनंतरची पदस्थापना देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे बरीच वर्ष एका विभागात काम करणा-या १५९ इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ५ लेखाधिकारी, ७ सहाय्यक लेखाधिकारी, १४ उपलेखापाल, १ सहाय्यक आयुक्त, ३ प्रशासकिय अधिकारी, ३ अधिक्षक/वसूली अधिकारी, २५ वरिष्ठ लिपिक/कर निरीक्षक, आणि १०१ लिपिक अशा १५९ कर्मचा-यांची बदलीने पदस्थापना करण्यात आलेली आहे. मागील आठवड्यात विविध संवर्गातील २४ कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आज १५९ जणांची बदलीने पदस्थापना करण्यात आलेली असून एकूण १८३ जणांच्या बदल्या झालेल्या आहेत.


---
सकारात्मक परिणामाची अपेक्षा
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कर्मचारीहिताय निर्णयाचा सकारात्मक परिणाम महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या कामावर होणार असून यामुळे नागरी सुविधा परिपूर्ती कार्याला अधिक गतीमानता प्राप्त होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT