मुंबई

नोकरीसाठी शिक्षकांच्या रांगा

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० ः नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी सोमवारपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्‍यामुळे मुलाखती आलेल्यांच्या पालिका मुख्यालयाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माध्यमिक विभागाच्या ६० आणि प्राथमिकच्या १२३ अशा १८३ जागांसाठी तब्बल १५०० जास्त अर्ज आले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, रायगड, पालघर आणि औरंगाबादसारख्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने शिक्षक मुलाखतींसाठी आले होते.
महापालिकेच्या माध्यमिक विभागामध्ये शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. अनेक शाळांवर शिक्षकांविना वर्ग चालवावे लागत आहेत. काही शाळांमध्ये एका शिक्षकाला तीन तुकड्यांना शिकवावे लागत आहे. काही ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर मराठी माध्यमाचे शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. विद्यार्‍थ्‍यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्‍याने महापालिकेने रिक्त पदांवर मुलाखतींद्वारे थेट शिक्षक भरतीचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतर्फे सहायक शिक्षक पदावर ठोक मानधनावर शिक्षक भरती केली जात असून तासिका तत्वावर मानधन दिले जाणार आहे. माध्यमिक शिक्षकाकरीता प्रति तास १५० रुपये मिळणार आहेत. याप्रमाणे प्रति दिन ६ तासिकांच्या कामासाठी अवघे ९०० रुपये शिक्षकांना मिळणार आहेत. जेवढे तासिका शिक्षकांना मिळतील, तेवढेच पैसे मानधन म्हणून शिक्षकांना दिले जाणार आहेत. महापालिकेने दिलेल्या जाहिरातीनुसार, सोमवारी उमेदवारांना त्यांच्या मूळ कागदपत्रांसहित तपासणे आणि सत्यप्रत सादर करण्यासाठी महापालिका मुख्यालयाबाहेर गर्दी झाली होती. उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे सादर केल्यानंतर महापालिकेतर्फे संकेतस्थळावर यादी जाहीर करून निवडीबाबत कळवण्यात येणार आहेत.


मराठी माध्यमाकरिता ३७ जागा, हिंदीसाठी ११, उर्दूसाठी दोन तर इंग्रजीसाठी १० अशा एकूण ६० रिक्त जागांवर महापालिकेतर्फे भरती करण्यात येत आहे. या सर्व जागांसाठी तब्बल ७५० पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. तर प्राथमिककरिता मराठी ८८, हिंदी - ३१ आणि उर्दू ४ अशा एकूण १२३ जागांसाठी ८०० पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत.

एमए डीएड शिक्षण झाले आहे, मात्र पाच वर्षांपासून बेरोजगार आहे. दोन वर्षांपासून खासगी शिकवणी वर्ग घेत आहे, चांगल्या नोकरीची आशा असल्‍याने भरती प्रक्रियेत सहभागी झाले असून नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
- सुरेखा पवार, एमए., डी एड, शहापूर

कठीण परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले मात्र सहा वर्षे झाले बेरोजगार आहे. नोकरी नसल्यामुळे घर चालवणे कठीण होते, चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. खासगी शाळांमध्ये १० ते १२ हजारावर काम करणे परवडत नाही. नोकरी मिळेल या आशेने आले आहे
- कांचन चिकणे, एमकॉम., डीएड., कळवा

शिक्षण घेऊन पंधरा वर्षे झाले नोकरीच्या शोधात आहे. नोकरीसाठी वणवण फिरले, कुठे नोकरी मिळत नाही, शिक्षणाचा फायदा व्हावा हीच अपेक्षा आहे. मुलाखत देत आहे, नशिबाने काम झाले पाहिजे.
- संगीता परदेशी, बीए., डीएड., कल्याण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT