मुंबई

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे लोकल प्रवाशांचे हाल

CD

मुंबई, ता. १० : मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकात सोमवारी (ता. १०) सायंकाळी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा विस्कळित झाली होती. परिणामी अप धीम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गांवर लोकलचा खोळंबा झाला. सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या लोकलही उशिराने धावत असल्याने घरी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास भायखळा रेल्वेस्थानकातील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. परिणामी दादर, ठाणे व कल्याणकडून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. एकामागोमाग एक लोकलच्या रांगा लागल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. ते लोकलमध्ये अडकून पडले. मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने अवघ्या काही मिनिटांत बिघाड दुरुस्त केला; मात्र दरम्यान अप मार्गावर अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. बिघाडामुळे लोकल सेवा सायंकाळी सातपर्यंत रखडली. त्यानंतरही लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT