मुंबई

गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

CD

डोंबिवली (बातमीदार) : आपली आजची येणारी पिढी ही खऱ्या अर्थाने भारताचे भविष्य आहे; पण यातील अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यात थांबवावे लागत आहे. यासाठी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गरजू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉ. रेखा बहनवाल यांनी विकास पाटील यांना हिंदी हायस्कूल जोशीबाग कल्याण शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची गरज आहे आणि आपल्या मार्फत या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात यावे अशी विनंती केली. त्या अनुषंगाने रावबहादुर हिंदी प्राथमिक स्कूल जोशीबाग कल्याण पश्चिम या शाळेतील १२५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, अशी माहिती मंडळाचे सांस्कृतिक प्रमुख विनोद शेलकर यांनी दिली.
….
भिवंडीतील स्वच्छ भारत अभियान इंटर्नशिप
भिवंडी (बातमीदार) : भिवंडी निजामपूर शहर महापालिका क्षेत्रातील पदविका/पदवी शिक्षण घेणाऱ्या व किमान पदविका/पदवी अशी शैक्षणिक अहर्ता धारण केलेल्या युवांसाठी स्वच्छ भारत अभियान इंटर्नशिप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या इंटर्नशिपचा कालावधी १५ दिवसांचा असणार आहे. या इंटर्नशिपसाठी घनकचरा वर्गीकरण जनजागृती, घनकचरा व्यवस्थापन मोहीम राबविणे, माहिती विश्लेषण व व्यवस्थापन, सामाजिक माध्यमांद्वारे मोहीम राबविणे असे विषय असणार आहेत. इंटर्नशिपसाठी इच्छुकांनी https://internship.aictenda.org/register_new.php या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमदेवारास प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येईल, असे आरोग्य विभागाचे उपायुक्त दीपक झिंजाड यांनी सांगितले.
…..
‘दापुर माळ व सावरखुट रस्त्यासाठी निधी द्या’
खर्डी (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील दापुर-माळ व दापूर सावरखुट या आदिवासी लोकवस्ती असलेल्या अतिदुर्गम पाड्यात स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच आजही या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावाला मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती; परंतु अद्याप रस्त्याचे काम न झाल्याने पावसाळ्यात रुग्ण व गरोदर मातांना ५ ते ६ किमी झोळी करून अजनुप येथील मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागते. त्यामुळे यागावात या रस्त्यांची कामे मंजूर करावी व येथील रहिवाशांना दळणवळण व आरोग्यविषयक सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी येथील रस्त्याला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे.
….
खर्डी : दापूर-माळ गावाला जोडणारा रस्ता नसल्याने ग्रामस्थांचे हाल होते आहेत.
…………..
मनसेच्या उपक्रमाला दिवेकरांचा प्रतिसाद
दिवा (बातमीदार) : राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेल्या जनतेच्या मनातल्या संतापला वाट मोकळी करून देण्यासाठी मनसेने एक सही संतापाची या राज्यव्यापी उपक्रमाची सुरुवात केली होती. मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवा स्टेशन मार्गावर, मुंब्रादेवी कॉलनी ऑटो स्टँड समोर हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला दिव्यातील सामान्य जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकांच्या मनात असलेली चीड सहीच्या माध्यमातून व्यक्त करून सर्वसामान्य जनतेने राजकारणाचा बाजार मांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सणसणीत चपराक लगावली असल्याचे मत शहराध्यक्ष तुषार पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी दिवा मनसेचे सर्व पदाधिकारी, महिला सेना, विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…….
भिवंडीत मनसैनिकांनी एक सही मोहीम
भिवंडी (बातमीदार) : सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंक लागला असून जिल्हा, तालुका, ग्रामीण पातळीवरून गलिच्छ राजकारण्यांच्या विरोधात संतापाची लाट उसलळी आहे. सर्वसामान्यांच्या या संतापाला वाट करून देण्यासाठी मनसेतर्फे ‘एक सही संतापाची’ हा उपक्रम राबवण्यात आला. भिवंडी तालुक्यातील अंजुर गावात ही मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला जनतेमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान सदर प्रसंगी बालपणापासून शिवसेनेचे कट्टर असलेले जितेश पाटील यांनी सद्यस्थितीतील गलिच्छ राजकारणामुळे राज ठाकरे यांचा झेंडा हाती घेतल्याची खदखद व्यक्त करून सर्व बंडखोरा विरोधात संताप व्यक्त करून राज ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याची ग्वाही दिली. तसेच अनेकांनी आता फक्त राज ठाकरेच महाराष्ट्र घडवू शकतात, शी प्रतिक्रिया व्यक्त केली.
…..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT