मुंबई

निकृष्ट कामांची पावसात पोलखोल

CD

घणसोली, ता. ११ (बातमीदार)ः पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी महापालिकेने केलेल्या निकृष्ट कामांची पोलखोल सुरू झाली आहे. अशातच महापालिकेच्या जुहूगाव शाळेच्या प्लास्टरची पडझड होत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत यावे लागत आहे. त्यामुळे पालिका शाळेची इमारत धोकादायक असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
नवी मुंबईतील महापालिकेच्या शाळेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी शाळेत येण्यासाठी मैदानातील चिखल तुडवून मुलांना प्रवेश करावा लागत आहे, तर अनेक ठिकाणी इमारतींची दुरवस्था झालेली आहे. नवी मुंबईतील शाळा क्रमांक ३८ जुहूगाव शाळेचीदेखील सध्या अशीच अवस्था झाली आहे. या शाळेच्या भिंतीचे प्लास्टर धोकादायक अवस्थेत आहे. अशातच सध्या सुरू असलेल्या पावसात इमारतीचे प्लास्टर कोसळत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच या शाळेची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील अशी परिस्थिती असल्यामुळे कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
------------------------------
इमारतींवर कोट्यवधींचा खर्च
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून शाळेच्या इमारतींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत; मात्र इतके पैसे खर्च होऊनही इमारतींची अवस्था अतिशय वाईट आहे. सद्यस्थितीत जुहूगावातील शाळेत २५० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जर शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षकांच्या अंगावर प्लास्टर पडल्यास गंभीर दुखापतीची शक्यता आहे.
------------------------------------------------
जुहू गाव शाळा क्रमांक ३८ या ठिकाणी झालेल्या शाळेच्या दुरवस्थेबद्दल स्थापत्य विभागाला सूचना दिल्या आहेत. येत्या आठ ते दहा दिवसात या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल. मुलांच्या सुरक्षेची काळजी घेऊन लवकर लवकर योग्य निर्णय घेण्यात येतील.
-अनिल सोंडगे, विभाग अधिकारी, वाशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT