मुंबई

पदपथावर डेब्रिजचे ढिगारे

CD

खारघर, ता. ११ (बातमीदार) : पावसाळ्यात शहरातील नाले तुंबू नये, यासाठी पालिकेकडून नालेसफाई केली जात आहे. मात्र, पालिकेच्या ठेकेदारांकडून गटारातून बाहेर काढलेली माती तशीच पदपथांवर ठेवण्यात आली असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
तळोजा वसाहत सिडकोकडे असताना सेक्टरनिहाय ठेकेदारांची नेमणूक करून नाले, गटारे साफसफाईची कामे दिली जात होती. अशातच आता सिडको वसाहत पनवेल पालिकेकडे हस्तांतर झाल्यावर पावसाळ्यापूर्वीची कामे योग्य प्रकारे होतील, अशी अपेक्षा रहिवाशांना होती. मात्र, परिस्थिती अजूनही तशीच असल्याचा अनुभव तळोजावासीयांना येत आहे. कारण पावसाळा सुरू झाल्यानंतरही तळोजा फेज एक वसाहतीत गटारांची साफसफाई केली जात असून काढलेली माती, कचरा पदपथांवरच ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे गटारातील माती तसेच काढलेला कचरा पावसामुळे पुन्हा गटारात जात असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
--------------------------------------------
स्वच्छतेबाबत अनोखा निष्कर्ष
सिडकोकाळात पावसाळी कामासाठी प्रकल्पग्रस्त ठेकेदाराच्या चढाओढीमुळे काम मिळावे, म्हणून कमी दरात निविदा भरली जात असे. त्यामुळे अनेकदा नाले, गटारांची साफसफाई होत नसल्याचे निदर्शनास येत होते. आता तळोजा वसाहत पालिकेकडे हस्तांतरित झाली असून ज्या प्रभागात पाणी तुंबले जाण्याची शक्यता त्याच ठिकाणी स्वच्छता केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT