मुंबई

अमली पदार्थ विक्रेत्यांवर धाडसत्र

CD

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने वाशी आणि खारघरमध्ये केलेल्या कारवाईत तब्बल १० लाख ६५ हजारांचे मेथ्यॅक्युलोन जप्त केले आहे. तसेच या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
सायन-पनवेल महामार्गालगत वाशी प्लाझा येथे रविवारी (ता. ९) रात्री ७.३० च्या सुमारास एक व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीरज चौधरी, पोलिस उपनिरीक्षक कुलदीप मोरे यांच्या पथकाने वाशी महामार्गालगत सापळा लावून दीपक सूर्यवंशी (३७) याला ताब्यात घेतले. यावेळी अमली पदार्थ विरोधी पथकाने घेतलेल्या झडतीत जवळपास ५२.९० ग्रॅम वजनाचे ५ लाख २९ हजार रुपये किमतीचे मेथ्यॅक्युलोन अमली पदार्थ सापडले. त्यामुळे याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तर दुसऱ्या कारवाईत खारघर सेक्टर-३४ बी मधील बोंजर सोसायटीच्या समोरील रोडवर अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या निशार मोहम्मद शेख (२३) या रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी त्याच्याकडे ५३.५६ ग्रॅम वजनाचे ५ लाख ३५ हजार ६०० रुपये किमतीचे मेथ्यॅक्युलोन सापडले आहे. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
------------------------------------------------
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे व गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘अमली पदार्थमुक्त नवी मुंबई अभियाना’अंतर्गत कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनाही अमली पदार्थांसंबंधी काही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
- नीरज चौधरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमली पदार्थविरोधी कक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT