मुंबई

अग्निशमन दलात लवकरच आणखी दोन अत्याधुनिक रोबो

CD

मुंबई, ता. ११ ः मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात पाच वर्षांपूर्वी अत्याधुनिक रोबो दाखल झाले होते. आता येत्या सहा महिन्यांत आणखी दोन रोबो दाखल होणार आहेत. दोन्ही रोबो फ्रान्सवरून खरेदी केले जाणार असून त्यांच्यासह व्हेईलकलसाठी सहा कोटी आठ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. दोन्ही रोबो बॅटरीवर चालणारे असून कितीही तास धगधगत्या आगीत आणि पसरलेल्या धुराशी सामना करीत चिंचोळ्या गल्ल्यांमध्येही सहज जाऊन आग विझवू शकणार असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

पालिकेतर्फे रोबोंची मागणी नोंदवण्यात आली असून आयुक्तांच्या मान्यतेनंतर खरेदी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मुंबईत उंचच उंच टोलेजंगी इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यांना आग लागल्यावर मोठ्या प्रमाणावर पसरणारी उष्णता आणि धुरामुळे अग्निशमन दलासमोर मोठी अडचण येते. अशा अडचणींना सामना करण्यासाठी आता दलाच्या ताफ्यात आणखी दोन अत्याधुनिक रोबो मदतीसाठी येणार आहेत. रोबो आगीच्या ज्वाळा आणि चिंचोळ्या गल्ल्या अशा ठिकाणी सहज जाऊन तिथली आग विझवू शकणार आहेत.

सहा कोटी आठ लाख रुपये
- दोन्ही रोबोंची किंमत सहा कोटी आठ लाख रुपये असणार आहे. धुरातही सर्व स्पष्टपणे दाखवण्याची रोबोतील थर्मल कॅमेऱ्याची क्षमता आहे.
- रोबो बॅटरीवर चालणारे असून ती चार तास चालते. ती संपल्यावर तत्काळ दुसरी बॅटरी जोडता येणार असल्याने रोबोला कितीही तास आगीशी झुंज देता येणार आहे.
- सध्या इस्राईल, चीन आणि अमेरिका असे रोबो तयार करते. विमानबांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियम पत्र्याच्या सहाय्याने त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
- फ्रान्सच्या कंपनीने तयार केलेला रोबो सुमारे ५५ मीटर उंचीपर्यंत पाण्याचा मारा करू शकतो.
- बेसमेंटवरून राहून आगीशी सामना करतानाच पसरलेल्या धुरातही जिन्यावरून वर इमारतीत शिरून रोबो आग विजवू शकणार आहेत. कॅमेऱ्यामुळे घटनास्थळाचाही अंदाज घेता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT