मुंबई

बोईसरमध्ये चालक, वाहकांची नेत्रतपासणी

CD

बोईसर, ता. १८ (बातमीदार) : बोईसर तारापूर रोटरी क्लबतर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पालघर विभागांतर्गत बोईसर आगारातील चालक आणि वाहक यांचे डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. प्रवाशांची सुरक्षा ही चालक आणि वाहकावर अवलंबून असते. त्यात चालक आणि वाहकांच्या आरोग्याची तपासणी व्हायला हवी.त्याअनुषंगाने चालक व वाहकांची नेत्रतपासणी करण्यात आली. ९५ चालक, वाहकांच्या डोळ्यांची तपासणी केली. त्यात ९ कर्मचाऱ्यांना मोती बिंद आढळले असून त्यांचे अधिकारी लाईफ बोईसर या खाजगी रुग्णालयात डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बोईसर आगारातील इतर कर्मचाऱ्यांची दुसऱ्या टप्प्यात मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती रोटरी क्लब बोईसर तारापूरच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. मोहिनी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड व पूजा ऑप्टिक यांचे संयुक्त विद्यमाने रोटरीयन डॉ. पराग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक रामनारायण गोयल, डॉ. वसीम काजी, प्रकल्प अध्यक्ष स्मिता जाधव, जतींदर सिंग चानी, आणि रोटरीयन प्रेसीडेंड वैशाली शिंदे, सेक्रटरी सहापुरे, रोटरीयन स्वामिनाथ पांडे बोईसर आगारचे मॅनेजर राजेंद्र उबाले, आणि त्यांचे सहकारी तसेच अधिकारी रुग्णालयाचे डॉ. सूर्वी आणि त्यांचे सहकारी, डॉ. विवेक मालिया आणि एमपीए यांची टीम यांच्या सहकार्याने चालक आणि वाहकांच्या डोळ्यांची तपासणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT