मुंबई

सोमय्यांच्या विरोधात शिवसेनेचा एल्गार

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर मंगळवारी संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चिंतामणी चौकात सोमय्या यांचा फोटो असलेल्या फलकाला जोडे मारो; तसेच पायदळी तुडवून त्या विकृत प्रदर्शनाचा जाहीर निषेध केला. या वेळी सोमय्या यांना अटक करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान सोमय्या यांचा प्रतीकात्मक तयार केलेला पुतळा पायदळी तुडविण्यापूर्वी पोलिसांनी तो पुतळा ताब्यात घेतला.
खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध नोंदविण्यात आला. या वेळी महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी सोमय्या यांच्या निषेधाचे फलक आंदोलनात दिसून आले. तसेच आक्रमक झालेल्या महिला शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत, सोमय्या यांचा फोटो असलेल्या फलकाला जोडे मारले; तसेच ते फलक पायदळी तुडवला. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, शहराध्यक्ष प्रदीप शिंदे, प्रकाश पायरे, महिला आघाडीच्या रेखा खोपकर यांच्यासह महिला कार्यकर्त्यांसह पदाधिकारी उपस्थित होत्या.
……
उल्हासनगरातही निषेध
उल्हासनगर (वार्ताहर) : शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी, महिला आघाडीने भरचौकात सोमय्या यांचा निषेध केला. सोमय्या यांच्या बॅनरवरील फोटोला जोडे मारण्यापूर्वीच पोलिसांनी बॅनर ताब्यात घेतला. तेव्हा पोलिस आणि शिवसैनिकांत झटापट झाली.
शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांच्या आदेशानुसार नेताजी चौकात हे आंदोलन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT