मुंबई

पनवेलमध्ये सुरू होणार पंतप्रधान किसान सुविधा केंद्र

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ : शेतकऱ्यांना लागणारी बी-बियाणे, औषधे, अवजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानांत जावे लागते. पंतप्रधान किसान समृद्धी केंद्राद्वारे शेतकऱ्यांना या सर्व सुविधा एकाच ठिकाणी पुरवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पनवेलमध्ये १८ केंद्र सुरू होणार आहेत. या केंद्राचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २७) राजस्थान येथील कार्यक्रमातून होणार आहे.
देशभरात जिल्हा, तालुका आणि खेडेगाव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी २ लाख ८० हजार दुकाने आहेत. या खत विक्री दुकानांचे किसान सुविधा केंद्रांमध्ये टप्प्या-टप्प्याने रूपांतर करण्यात येणार आहे. उत्तर रायगड क्षेत्रात असलेल्या पनवेलमध्ये १८, उरणमध्ये चार, खालापूरमध्ये ११, तर कर्जत तालुक्यात २४ अशी एकूण ५७ केंद्र असल्याची जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी माहिती दिली. वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, यासाठी शेतीमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध नवे तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, पिके, खते, शेतकऱ्यांच्या यशोगाथा याची माहितीही फिल्मद्वारे स्मार्ट टीव्हीतून केंद्रांमध्ये असणार आहे. या सर्व सुविधा स्थानिक भाषेत उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर किसान सुविधा केंद्राच्या परिसरातील शेतकऱ्यांना परस्परांशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ''किसान की बात''च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या देशभरातील एक लाखाहून अधिक खत विक्री केंद्रांचे रूपांतर पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांमध्ये करण्यात आले आहे. उर्वरित एक लाख ८० हजार खत विक्री दुकानांचे रूपांतर वर्षअखेरीस किसान समृद्धी केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती कोळी यांनी दिली.

केंद्रातून मिळणाऱ्या सुविधा
पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, औषधे, खते, कीटकनाशके हे एकाच ठिकाणी रास्त दरात उपलब्ध करून देणे. शेतकऱ्यांना माती, बियाणे आणि खतांच्या चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे; किंवा जेथे चाचणी सुविधा उपलब्ध आहे, त्या केंद्रांशी शेतकऱ्यांना जोडून देणे. शेतकऱ्यांना लागणाऱ्या अन्य सेवा विक्री पद्धतीने किंवा कस्टम हायरिंग सेंटरद्वारे उपलब्ध करून देणे. शेतकऱ्यांना विविध गोष्टींबाबत माहिती पुरवणे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणाच्या योजनांची माहिती देणे, असे असल्याचे नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT