बोईसर, ता. ३ (बातमीदार) : बोईसर येथील तारापूर रोड व नवापूर रोड या प्रमुख दोन मार्गाना जोडणाऱ्या सिडको रस्त्याचे निम्म्यापेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआरडी) प्राप्त निधीच्या आधारे तारापूर मार्गपासून सिडको रस्त्यावर २२३ मीटर रस्ता पूर्ण झाला आहे . या रस्त्यासाठी सुमारे ९० लाख खर्च झाला आहे. याखेरीज ओस्तवाल गृहनिर्माण सोसायटीपर्यंतचा १२० मीटर रस्त्याचे काम अजूनही प्रलंबित आहे. त्यासाठी ८० ते ९० लाख रुपये निधी आवश्यक आहे. हा निधी (एमएमआरडी) कडून मंजूर करून गणपती उत्सव अगोदर करण्याचे प्रयत्न जिल्हा परिषद कडून सुरू आहेत . तर ५०० मीटरपैकी ३०० मीटर रस्त्याचे काम करण्यासाठी पाच वर्षे लागली. शिल्लक १५० मीटर रस्त्यासाठी अजून किती वर्षे लागणार ? असा सवाल बोईसर परिसरातील नागरिक विचारत आहेत.
या रस्त्यालगत काही रहिवाशांनी १० ते १२ वर्ष अगोदर काही झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे ही झाडे रस्त्यासाठी अडथळा ठरत आहेत. रस्त्यालगत झाडे असल्याने रस्ता उर्वरित अरुंद आहे . ग्रामपंचायतने या झाडांच्या पुनर्लागवडीचा प्रस्ताव वनविभागकडे सादर केला आहे. तर उर्वरित ११७ मीटर रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत .. त्यामुळे वाहनचालकांना सुमारे ३०० ते ४०० मीटर अंतर पार करण्याऐवजी दोन ते अडीच किलोमीटर प्रवास करावा लागतो. त्यामुळे लवकरात लवकर अतिक्रमण अडथळे दूर करून हा रस्ता करावा अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
सिडको रस्ता दुरावस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रस्ता लवकरात लवकर चालू करून प्रवाशांना दिलासा देण्याचा निश्चित प्रयत्न करण्यात येईल.
प्रकाश निकम - जिल्हा परिषद अध्यक्ष
उर्वरित रस्ता निधीसाठी ५० लाख निधी प्रस्ताव पाठवलेला आहे . रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल.
संजय कुलकर्णी, उपअभियंता जिल्हा परिषद
प्रतिक्रिया ४)
बाधित सागाची झाडे कापून पुनर्रोपण ग्रामपंचायत करणार आहे . रस्त्यासाठी झाडे कापण्यास आमची हरकत नाही.
-अपेक्षा विशाल साटम - वन अधिकारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.