मुंबई

तळोज्यात वाहनचालकांची तारांबळ

CD

पनवेल, ता.२३ (बातमीदार)ः तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांना जागोजागी खड्डे पडलेले आहेत. तर अनेक ठिकाणी संपूर्ण रस्ताच उखडला आहे. अशा परिस्थितीत तळोजा औद्योगिक वसाहतीमधील गतिरोधकांची झालेल्या दुरवस्थेने वाहन चालकांची तारांबळ उडत आहे.
तळोजा एमआयडीसीमध्ये शेकडो कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये रासायनिक इलेक्ट्रिकल, फिशर व इतर कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये माल उतरवण्यासाठी तसेच घेऊन जाण्याकरिता मोठ्या संख्येने अवजड वाहने येतात. त्याचबरोबर एमआयडीच्या मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून गतिरोधक उभारण्यात आले आहेत. मात्र, सर्व गतिरोधकांची दुरवस्था झाली असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, याबाबत तळोजा वाहतूक पोलिसांनी एमआयडीसीकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या कुठल्याही पत्राची दखल एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जात नसल्याने लवकरात लवकर दुरुस्तीची मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.
--------------------------------
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर गतिरोधकांची दुरवस्था झालेल्या आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. एमआयडीसीने लवकरात लवकर गतिरोधकांची दुरुस्ती करावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- सुनील कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, तळोजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT