मुंबई

शिक्षणासाठी लाकडी ओंडक्याची बिकट वाट

CD

खर्डी, ता. ५ (बातमीदार) : मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या आदिवासी पाड्यांतील नागरिकांना अद्यापही भौतिक सुविधांच्या वानव्यामुळे खडतर जीवन जगावे लागत आहे. उद्याच्या समृद्ध राष्ट्राचे नागरिक असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी कधी बस, रस्त्याविना पायपीट करावी लागते; तर जीव धोक्यात घालून नदी, नाल्यातून वाट काढत जावे लागते. शहापूर तालुक्यातील सावरकुट आदिवासी पाड्यातील मुलांनाही शिक्षणासाठी लाकडी ओंडक्यावरून कसरत करत जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे.
अजनुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सावरकुट या आदिवासी पाड्यात १७ घरे असून १०० च्या आसपास लोकसंख्या आहे. मध्य वैतरणा धरणाच्या लगत हा पाडा असूनही येथील रहिवाशांना दैनंदिन साहित्य खरेदीसाठी खर्डी-कसारा बाजारपेठेत जाताना व विद्यार्थ्यांना शिरोळ येथील आश्रमशाळेत शिक्षण घेण्यासाठी ये-जा करताना जीवघेणी कसरत करावी लागते. पावसाळ्यात रस्त्यातील दगड-धोंड्यातून व नाल्याच्या ठिकाणी लाकडावरून जीव मुठीत घेऊन नाला पार करून रोज चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे; तर पावसाळ्यात पाणी असल्याने शाळेत जाणेही बंद होत असते. त्यामुळे येथील रहिवासी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

-------------
पूल बांधण्याची गरज
वैतरणा धरणाच्या पुढे छोटा पूल बांधून रस्ता केल्यास येथील रहिवाशांना ये-जा करण्याची सोय होईल; पण याबाबत कोणताही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नसल्याने स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊनही आजही येथील आदिवासी रहिवासी मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी केला आहे.

-----------
दापूर माळ वीज, रस्त्याविना
मध्य वैतरणा धरणाच्या खोऱ्यात दापूर माळ हा २० घरांचा आदिवासी पाडा आहे. संपूर्ण पायवाट दगड-गोट्यांनी भरलेली असून कच्चा रस्तादेखील नाही. डोंगर-दऱ्यांतून अंगावर येणारे वाकडेतिकडे चढ आणि सरळसोट उतार असलेली पायवाट असल्याने येथील रहिवाशांना धडपडत जीव मुठीत घेऊन चालावे लागते. गावात विजेचे खांब टाकून सहा महिने होऊनही वीजपुरवठा नाही. रस्ताच नसल्याने वाहने ये-जा करू शकत नाहीत. त्यामुळे येथील विकासाची वाटच बंद आहे.


----------
दापूर माळ तसेच सावरकुट येथील रस्त्यांच्या जागेसाठी वनविभागाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा सुरू आहे.
- एम. बी. परमार, ग्रामविकास अधिकारी, अजनुप

-------
सावरकुट येथे रस्ता, पाणी व विजेच्या समस्येबाबत वारंवार मागणी करूनही कोणीही लक्ष देत नसल्याने आमच्या विकासाची वाट खुंटली आहे. या सुविधा उपलब्ध होण्यासाठी लवकरच लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून दाद मागणार आहोत.
- अनंता वारे, ग्रामपंचायत सदस्य, अजनुप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरातील तपोवन मैदानावर योगी आदित्यनाथांची आज जाहीर सभा

Winter Soup Recipe: हिवाळ्यात सकाळी नाश्त्यात प्या गरमागरम गाजर सूप! शरीर राहील उबदार, लगेच लिहा रेसिपी

Sakal Podcast: फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या

आजचे राशिभविष्य - 17 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT