मुंबई

तिकीट हरवले ? ११०-१५० रुपयांचा भुर्दंड !

CD

मेट्रोचे तिकीट हरवल्‍यावर १३० रुपयांचा भुर्दंड!
प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गंतव्य स्थानावर पोहोचेपर्यंत आपले तिकीट सांभाळून ठेवावे, असे वारंवार सांगण्यात येते. तरीही प्रवासादरम्यान तिकीट हरवल्यास ११० ते १३० रुपये इतका दंड म्हणून मेट्रो प्रशासन वसूल करते. प्रवासी मात्र त्यामुळे नाराजी व्यक्त करत आहेत. मेट्रोचे तिकीट असेल तरच स्थानकात प्रवेश मिळतो. मग ते हरवल्यास दंड करणे चुकीचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
मेट्रो २ अ आणि ७ चे तिकीट काढण्यासाठी ‘मुंबई वन’ ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यावर मेट्रो २ अ आणि ७ च्या अंधेरी पश्चिम ते गुंदवली (दहिसरमार्गे) दरम्यानच्या सर्व स्थानकांचे तिकीट प्रवास सुरू करण्याआधीच काढता येते. क्यूआर कोड तयार होतो व तो दाखवून मेट्रोमध्ये चढता येते. असे तिकीट गहाळ होण्याचा प्रश्न उद्‍भवत नाही; मात्र खिडकीवरून तिकीट घेतल्यास प्रवास पूर्ण होईपर्यंत प्रवास आणि बाहेर निघेपर्यंत ते सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. प्रवासादम्यान तिकीट गहाळ झाल्यास त्याची पूर्ण रक्कम अधिक ५० ते ८० रुपये असा एकूण ११० ते १३० रुपये दंड मेट्रो प्रशासन दंड म्हणून घेते. सोबतच मेट्रो वनमध्ये हा दंड ९० ते १०० रुपये इतका आहे, अशी माहिती दोन्ही मेट्रो प्रशासनाद्वारे देण्यात आली.

दहिसरवरून अंधेरीला जात असताना तिकीट घेतले होते; मात्र लहान मुलांना उतरवताना तिकीट कुठे तरी पडले. तिकीट काढल्याशिवाय आत प्रवेशच नाही असे असताना ११० रुपये इतका दंड घेण्याचे कारण काय? इतक्या सुरक्षेतून आत गेल्यानंतर विनातिकीट प्रवास कोणीही करणे शक्य नाही. आमची मागणी आहे, की तिकीट गहाळ झाल्यास दंड म्हणून तिकिटाची रक्कम आणि १० ते २० रुपये अधिक घेण्यात यावेत.
- मानसी कदम, प्रवासी अंधेरी

गोरेगाव पश्चिमवरून मी प्रवास करत होतो. माझ्याकडून एकदा उतरताना तिकीट गहाळ झाले. बाहेर पडताना माझ्याकडे ११० रुपये इतकी रक्कम दंड म्हणून मागण्यात आली. मेट्रो प्रशासनाने दंड घ्यावा मात्र ती रक्कम किती आहे, त्याचे स्वरूप नेमकं काय हे सांगणारे ठळक अक्षरात स्थानकांवर नोटिफिकेशन लावावे.
- अंकित शर्मा, प्रवासी, दहिसर

कित्येकदा या अडचणींचा सामना केला आहे. विशेषतः पावसाळ्यात तिकीट भिजले किंवा फाटले तर स्कॅन होत नाही. अशा वेळी अनेकदा तिकिटासाठी दंड मागितला जातो.
- मिलिंद तिवारी, प्रवासी

रोज मेट्रोने प्रवास करते. सुरुवातीला तिकीट बॅगमध्ये ठेवले की ते सापडत नसायचे. म्हणून मी आता कार्ड बनवून घेतले आहे; मात्र प्रवाशांना सोयीच्या अशा सुविधा देण्यावर मेट्रो प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.
- अनिशा चौधरी, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT