मुंबई

उल्हासनगरात सदैव तेवणारी ज्योत

CD

उल्हासनगरात सदैव तेवणारी ज्योत
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; पाकिस्तानातील पिरघोट ते उल्हासनगर असा प्रवास

उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : पाकिस्तान ते उल्हासनगर अशा प्रवासात गेल्या १२५ वर्षांपासून सतत तेवत राहणारी उल्हासनगरातील चालिया मंदिरातील ‘ज्योत’ला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. मंदिरातील भव्य सोहळ्यात रेकॉर्ड टीमचे दुष्यंत चतुर्वेदी यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र सोपवण्यात आले.
अखंड भारत अस्तिवात असताना पाकिस्तानातील सिंध प्रांतात असणाऱ्या पिरघोट शहरामधील चालिया मंदिरात ही ज्योत ५० वर्षे तेवत होती. १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यावर तेथील सिंधी बांधवांना उल्हासनगरात आश्रय देण्यात आला. तेव्हा तेथील सिंधी बांधवांनी पिरघोटमधील ही ज्योत तेवत ठेवत उल्हासनगरात आणली. ही ज्योत ७५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या चालिया मंदिरात स्थापित करण्यात आली. तेव्हापासून ही ज्योत विझू देण्यात आली नसून पाकिस्तान ते उल्हासनगर अशा १२५ वर्षांपासूनच्या प्रवासात ही ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्यात आली आहे. लक्ष वेधणारी आणि अवाक् करून सोडणारी ही माहिती बघितल्यावर रेकॉर्ड टीमने या ज्योतीची रेकॉर्डमध्ये नोंद केल्यावर गुरुवारी (ता. १७) टीमचे दुष्यंत चतुर्वेदी यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुरस्कार, ट्रॉफी देण्यात आली. या वेळी आमदार कुमार आयलानी, गंगोत्री फाऊंडेशनचे भारत गंगोत्री, सोनिया धामी, सुनीता बगाडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी, सामाजिक कार्यकर्ते काजल मूलचंदानी, शशिकांत दायमा आदी उपस्थित होते. शिवाय इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्डवाईड बुक ऑफ रेकॉर्ड यांनीही सतत तेवत राहणाऱ्या ज्योतीचे कौतुक करून तसे पत्र पाठवले आहे.

----
आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुकमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न
उल्हासनगरातील ज्योत अखंडपणे तेवत राहण्याची माहिती गंगोत्री फाऊंडेशनचे भारत गंगोत्री, सोनिया धामी यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे पाठवली होती. आता या पवित्र ज्योतीची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुकमध्ये नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती भारत गंगोत्री व सोनिया धामी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT