मुंबई

म्हाडाच्या लॉटरीत शिक्षकांसाठी सदनिका राखीव ठेवा

CD

म्हाडाच्या लॉटरीत शिक्षकांसाठी सदनिका राखीव ठेवा
महाराष्ट्र पुरोगामी संघटनेची मागणी
घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) ः म्हाडा घर लॉटरी प्रक्रियेत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सदनिका राखीव ठेवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत म्हाडाकडून लॉटरी पद्धत राबवली जात असताना विविध उत्पन्न गटांसाठी, पत्रकार, म्हाडा कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, आमदार, खासदार, केंद्रीय कर्मचारी, राज्य शासकीय कर्मचारी अशांसाठी सदनिका राखीव ठेवण्यात येतात. त्या प्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही घरे राखीव ठेवली जात नाहीत. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची माहिती संघटनेचे पश्चिम विभाग संघटक अनिल राऊळ यांनी दिली.

आरक्षण न मिळण्याचे कारण
देशाची भावी पिढी सुजाण, सुशिक्षित, सुसंस्कारी आणि जबाबदार बनवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अविरतपणे पार पाडत असतात; मात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हे निमशासकीय कर्मचारी म्हणून गणले जातात; म्हणून म्हाडा लॉटरी घरासाठी अर्ज करताना त्‍यांना कोणतेही आरक्षण लागू होत नाही.

राष्ट्र घडवणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना म्हाडा लॉटरी प्रक्रिया आरक्षणापासून आजपर्यंत वंचित ठेवणे योग्य नाही. त्यांना म्हाडा लॉटरी प्रक्रियेत आरक्षण मिळेपर्यंत शासन दरबारी पाठपुरावा करणार आहोत.
- तानाजी कांबळे, मुंबई अध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT