मुंबई

मनोरुग्ण महिलांचे ‘धागे प्रेमाचे’

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : ठाण्यातील मनोरुग्णालयातील उपचारार्थ दाखल असलेल्या ३० ते ३५ मनोरुग्ण महिलांनी सुंदर आणि सुबक अशा कलात्मक एक हजार १०० राख्या बनवल्या आहेत. त्यातील ६०० राख्या त्या रुग्णालयातील पुरुष रुग्णांना बांधून रक्षाबंधन सण मनोरुग्णालयात साजरा होणार आहे. उर्वरित राख्या रुग्णालयातील कर्मचारी किंवा सामाजिक संस्थांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यापासून मिळणारे उत्पन्न हे रुग्णालयात जमा केले जाते. राखी बनवणे हा उपचाराचा एक प्रकार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही प्रादेशिक मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागातील महिला रुग्ण राख्या बनवत आहेत. यंदाही जवळपास ३० ते ३५ महिला रुग्णांनी गेल्या १५ दिवसांत तब्बल एक हजार १०० कलात्मक राख्या बनवलेल्या आहेत. आकर्षक रंगीत गोंडे तसेच मणी व मोत्यांपासून राख्या बनवलेल्या आहेत. राख्या बनवणे हा एकप्रकारे उपचार आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक व उपअधीक्षिका डॉ. प्राची चिवटे यांच्या मार्गदर्शनानुसार राख्या बनवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून त्याचे साहित्य उपलब्ध करू देण्यात आले होते.

---------------
मनोरुग्ण औषधोपचाराने थोडे स्थिर झाल्यानंतर व्यवसाय उपचार विभागात त्यांना दाखल केले जाते. मनातील भीती कमी होऊन रुग्ण स्वावलंबी व्हावा म्हणून व्यवसाय उपचारतज्ज्ञ विविध उपक्रम व समुपदेशन करतात. सामूहिक उपक्रमातून सामाजिक कौशल्ये वाढीस लागतात, ज्याचा त्यांना पुढे पुनर्वसनात उपयोग होतो. या उपक्रमातून राख्या बनवल्या जात आहेत. राख्या विकत घ्यायच्या असल्यास रुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागात संपर्क साधावा.
- डॉ. हेमांगिनी देशपांडे, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT