मुंबई

ई-चलान न भरल्यास कारवाईचा बडगा

CD

बोईसर, ता. २८ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाचा ‘वन स्टेट वन ई-चलान’ एप्रिल २०१९ पासून पालघर जिल्ह्यात कार्यान्वित झाला आहे. वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ई-चलान प्रणालीद्वारे कारवाई केली जात आहे. ई-चलान प्रणालीद्वारे कारवाई केलेल्या चालकांनी ई-चलान रकमेचा भरणा करावा; अन्यथा ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लोकअदालतीत हजर राहावे, असे निर्देश वाहतूक पोलिस प्रशासनाने दिले आहेत. तसेच ई-चलान भरण्यासाठी विविध पर्यायही उपलब्ध केले आहेत.

वाहतुकीचे नियम मोडणारे चालक अनेकदा ई-चलानची तडजोड रक्कम भरण्यास तयार नसतात. अशा वाहनचालकांचे चलान अनपेड या शीर्षकाखाली प्रलंबित असते. अशा चालकांनी कारवाईनंतर काही दिवसांत तडजोड रक्कम जमा करणे आवश्यक असते; मात्र शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेल्या चालकांनी ई-चलानची रक्कम जमा केली नसल्याची बाब समोर आली आहे. अशा चालकांना वाहतूक नियत्रंण शाखेच्या कार्यालयाकडून वारंवार मेसेज पाठवण्यात आले आहेत. यानंतरही चालकांनी चलानची रक्कम जमा केली नसल्याने त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला; तर शेवटची एक संधी म्हणून ९ सप्टेंबरपर्यंत चलानची रक्कम जमा करा, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ई-चलान कुठे भरू शकता?
पालघर पोलिस ठाणे चौकीशेजारी जिल्हा वाहतूक शाखा चौकी, रेल्वे स्टेशन, पालघर (पश्चिम) येथे रक्कम रोख स्वरूपात अथवा डेबिट कार्डद्वारे, क्रेडिट कार्डद्वारे ई-चलान भरू शकता. चाररस्ता, पाचबत्ती वाहतूक शाखा रेल्वे स्टेशनचौकी, बोईसर रेल्वे स्टेशन चौकी, मधुरनाका, ओसवाल नाका, चारोटी कोस्टल चौकी, तलासरी नाका चौकी, खंडेश्वरी नाका, कुडुस चौकी, डहाणू, सफाळा तसेच वाणगाव, घोलवड, जव्हार, विक्रमगड, मोखाडा या विभागातील वाहतूक अंमलदारांकडे ई-चलानची रक्कम भरू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Job: पुण्यात ह्युंदाईचा प्रकल्प! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधानांचे आभार

Nashik Crime: मागील भांडणाची कुरापत काढून दोन महिलांसह तिघांनी घरात घुसुन केली मारहाण; ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Bopdev Ghat Crime : बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपीची लवकरच ओळख परेड

Khed Shivapur Crime : राजगड पोलिसांच्या पाच कोटीच्या कारवाईला राजकीय ब्रेक; रक्कम जप्ती नंतर सर्वच अधिकाऱ्यांचे कानावर हात

Udgir News : चेक पोस्टवर एक लाख ८० हजाराची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT