मुंबई

मुंबई विमानतळावर बॉम्बची धमकी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबई विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आल्याची घटना शुक्रवारी घडली. नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा दूरध्वनी आल्यानंतर मुंबई पोलिसांसह यंत्रणा सतर्क झाल्या. पोलिसांनी फोन कॉल तपासणी केली असता सातारा येथे राहणाऱ्या १० वर्षांच्या मुलाने दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले.

नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गुरुवारी धमकीचा फोन कॉल आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने विमानतळावरील विमानात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. तसेच विमान १० तासांनी टेक ऑफ करणार असून मदतीची आवश्यकता असल्याचे कॉल करणाऱ्याने सांगितले. या माहितीनंतर नवी मुंबई पोलिसांकडून तत्काळ पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यासोबतच दहशतवादविरोधी यंत्रणा, स्थानिक सहार पोलिस, बॉम्ब शोधक पथकाला सतर्क करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण विमानतळाची सुरक्षा यंत्रणांकडून पाहणी करण्यात आली. त्यासोबतच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली होती. पोलिसांनी दूरध्वनी आलेल्या क्रमांकाला ट्रेस करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. धमकीचा फोन सातारा जिल्ह्यातील एका रहिवाशाचा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी रहिवाशाची चौकशी केली असता त्यांच्या १० वर्षांच्या अपंग मुलाने चुकून दूरध्वनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
--
१० दिवसांत दुसरी घटना
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर परिसरात सीरिअल बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याची धमकी फोनवर मुंबई पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ३४ वर्षीय आरोपीला लातूर जिल्ह्यातून अटक केली आहे. धमकीच्या फोननंतर मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

Family Man 3 : फॅमिली मॅन 3 मध्ये दिसणार 'हा' अभिनेता ; काही महिन्यांपूर्वीच सुपरहिट सिनेमात केलं होतं काम

Nitin Gadkari: "तर बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर लोक ड्रोननं उतरतील अन्..."; गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

Latest Marathi News Live Updates: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT