मुंबई

विक्रम मोडणाऱ्या गोविंदाला २१ लाखांचे ‘लोणी’

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : नऊ थरांचा विश्वविक्रम मोडून १० थरांचा नवीन विक्रम रचणाऱ्या गोविंदाला तब्बल २१ लाखांच्या बक्षिसाचे लोणी चाखायला मिळणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानने ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या दहीहंडीत सहभागी होण्यासाठी ३०० पेक्षा जास्त गोविंदा पथकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे ठाणे, मुंबईतील गोविंदांमध्ये विक्रम मोडण्याची चढाओढ पाहायला मिळणार आहे.
वर्तकनगर येथील महापालिका शाळेच्या मैदानावर संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे प्रताप सरनाईक फाऊंडेशनच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचे दरवर्षीप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता. ६) रात्री १२ वाजता हिंदू संस्कृतीप्रमाणे रितसर दहीहंडीचे पूजन करून हंडी बांधण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे, मुंबई व महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक संघाची सलामी स्वीकारण्यात येणार असून सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

बक्षिसांची लयलूट
दहीहंडी उत्सवामध्ये दुपारी १२ ते ६ च्या दरम्यान चार थर, पाच थर, सहा थर लावून सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला हेल्मेट व सेफ्टी किटसह १० हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सात थर लावणाऱ्या पथकाला २५ हजार रोख व ट्राफी व आठ थर लावून सलामी देणाऱ्या पथकाला एक लाख रोख व ट्राफी देण्यात येणार आहे. सर्वप्रथम नऊ थर लावणाऱ्या पथकाला ११ लाख रुपये व ट्राफी व त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या पथकाला पाच लाख रोख व ट्राफी देण्यात येणार आहे. तसेच संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मैदानावर विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला २१ लाख रुपये रोख व ट्राफी देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकांसाठीही १० हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nithin Kamath: ‘माझा स्वतःचा फोन सतत सायलेंट असतो...’; Zerodha चे संस्थापक नितीन कामथ यांनी सांगितलं यशामागील तत्वज्ञान

Maharashtra Election: राज्य व केंद्राच्या यंत्रणांकडून कारवाई; गेल्या २४ तासांत ५२ कोटी जप्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का! निवडणूक जिंकली तरी होणार नाहीत मुख्यमंत्री; भाजपने दिला नवा फॉर्म्युला

Dhananjay Munde: लोकसभेतील राड्याचा विधानसभेवर परिणाम! निवडणूक आयोगाने धनंजय मुंडेंच्या मतदारसंघाची हायकोर्टाला दिली 'गॅरंटी'

Congress Candidates: काँग्रेसमध्ये खळबळ! तिकिट जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांतच मोठ्या नेत्याने माघारी केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT