मुंबई

ठाण्यात एसटीची ‘घुसमट’

CD

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १३ : तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) नजीकचे मार्ग आर्थिक आधार देत आहेत. ठाणे जिल्ह्यातून बोरिवली, भाईंदर, भिवंडी, कल्याण, पनवेल या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर एसटी बस चालवण्यात येत आहेत. मात्र, काही वर्षांपासून ठाणे शहर आणि वाहतूक कोंडी हे समीकरण बनले आहे. मेट्रोची, रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यातच काही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला आहे. त्यावरील अपघातांमुळे वाहतूक कोंडीचा ताप वाढला आहे. या कोंडीमुळे केवळ प्रवाशांचीच नव्‍हे तर एसटीचीही घुसमट होत आहे. ठाणे विभागात दिवसाला २२० बसफेऱ्या रद्द कराव्‍या लागत असून गेल्या सहा महिन्यांत सहा कोटी ३० लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

ठाणे शहरासह आजूबाजूच्या शहरात मेट्रो, रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. उड्डाणपुलांची दुरुस्ती, रस्त्यांवरील खड्डे आणि घोडबंदर रोडवर सुरू असलेली वाहन अपघातांची मालिका यामुळे वाहतूक कोंडीचा दररोज त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे इंधन आणि वेळ दोन्ही वाया जात असल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागत आहे. कधी-कधी दहा-पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी तास-दीड तास रखडावे लागत आहे. सकाळी आणि संध्याकाळी वाहनसंख्या वाढत असल्यामुळे या त्रासात आणखी भर पडत आहे. याचा फटका आता एसटीच्या ठाणे विभागाला बसू लागला आहे.

ठाणे विभागाच्या दररोज ४५० गाड्या रस्त्यावर धावत आहेत. दिवसभरात विविध मार्गांवर साडेतीन हजार फेऱ्या चालवल्या जातात. यामध्ये जिल्हा पातळीवर अडीच हजार, तर लांब पल्ल्यावर एक हजार फेऱ्या होतात. वाहतूक कोंडीमुळे दिवसाला २२० फेऱ्या रद्द होत आहेत. दरदिवशी दहा हजार किलोमीटरचा प्रवास रद्द झाल्याने प्रति किलोमीटर ३५ रुपयांप्रमाणे साडेतीन लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडवावे लागत आहे. महिन्याला एक कोटी ५ लाख रुपये नुकसान ठाणे विभागाला होत आहे. सहा महिन्यांपासून हा त्रास सुरू असल्याने एसटीच्या ठाणे विभागाला सहा महिन्यांत सहा कोटी ३० लाख रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
--------
ठाणे विभागातून दररोजच्या बसफेऱ्या
जिल्हा पातळी : २,५००
लांब पल्ला : १०००
रद्द : २२०
नुकसान : ३,५०,००० रुपये
..............................
हे आहेत फेऱ्या रद्द होणारे मार्ग
ठाणे-बोरिवली, ठाणे-भाईंदर, ठाणे-भिवंडी, ठाणे-कल्याण, भिवंडी-कल्याण, कल्याण-पनवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT