Mumbai local Breaking : ‘अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १५ स्थानकांचे विकास काम रेल्वेने हाती घेतले आहे. यापैकी परळ, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भायखळा रेल्वे स्थानकांचे पुनर्विकास काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे परळ स्थानकावरून मोठ्या प्रमाणात रुग्ण प्रवासी ये-जा करत असल्याने त्यांच्या सोयीसाठी पहिल्या टप्प्यातच परळ स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम रेल्वेने हाती घेतले असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय रेल्वेने विमातळाच्या धर्तीवर ‘अमृत भारत स्थानक’ योजना सुरू केली आहे. सध्या या योजनेत देशभरातील एक हजार २७५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
यामध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्टॅंड हर्स्ट रोड, चिंचपोकळी, भायखळा, परळ, माटुंगा, वडाळा रोड, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, इगतपुरी, शहाड आणि टिटवाळा स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यापैकी परळ, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भायखळा रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन मध्य रेल्वेने आखले आहे.
मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकापैकी परळ स्थानक आहे. या स्थानकाचा टाटा कॅन्सर, केईएम, वाडिया हॉस्पिटलला जाण्यासाठी रुग्णांकडून वापर केला जातो. तसेच दररोज साधारण ४० हजार प्रवासी या स्थानकावरून ये-जा करतात. परळ वैद्यकीय शिक्षणाचे मुंबईतील एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे.
त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी अमृत भारत योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातच परळ स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. या स्थानकाच्या पुनर्विकासासाठी अंदाजे १९.४१ कोटी रुपये खर्च येणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत या स्थानकाचे पुनर्विकास करण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. त्या दिशेने रेल्वेकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.
.
असा होणार विकास-
- फलाटांवर लिफ्ट, सरकते जिने
- सिवेज ट्रीटमेंट, प्लांटच्या सुविधेसोबत नवीन शौचालय
- सर्क्युलेटिंग एरिया आणि ट्रॅफिक प्लॅन सुधारणे
- स्टेशनच्या दर्शनी भागात सुधारणा
- स्थानकावर प्रकाश व्यवस्था सुधारणे
- नवे आधुनिक दिशादर्शक फलक
- आद्ययावत सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा
- बुकिंग ऑफिस आणि अन्य कार्यालयाचे नूतनीकरण
- दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा
स्थानक - खर्च
परळ- १९.४१ कोटी
विक्रोळी - १९. १६ कोटी
कांजूरमार्ग - २७. ०१ कोटी
भायखळा - ३५.५२ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.