मुंबई

Thane Crime: हद्दपार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात, गुन्हा दाखल

CD

ठाणे (वार्ताहर) : वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्तांनी अभिलेखावरील आरोपी अझमुद्दीन सिराज शेख (४२) याला ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रायगड व पालघर या जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्ष हद्दपार केले होते; मात्र तो बाबूभाई पेट्रोल पंपाजवळ फिरत असताना गुन्हे शाखेच्या पथकास सापडला. पोलिस पथकाने त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…..
फ्लॅशमॉबद्वारे आरोग्याची जनजागृती
कल्याण (वार्ताहर) : मानसिक आरोग्य सप्ताह सध्या जगभरात साजरा केला जात असून त्यानिमित्ताने कल्याण पहिल्यांदाच फ्लॅश मॉब आणि रॅलीच्या माध्यमातून मानसिक आरोग्य विषयी जनजागृती करण्यात आली. कल्याणातील केंब्रिया इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेजच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. कल्याण पश्चिम येथील केंब्रिया इंटरनॅशनलपासून सुरू झालेली ही रॅली खडकपाडा मेन रोड, अमृत पार्क, वसंत व्हॅली, गोदरेज हिलमार्गे साई चौकात समाप्त झाली. त्यानंतर या रॅलीमध्ये उपस्थित असणाऱ्या केंब्रिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली. मानसिक आरोग्याबाबत विविध सकारात्मक संदेश देणारे फलक यावेळी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये होते.
…..
कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा मोर्चा
कल्याण (वार्ताहर) : उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी पद्धतीचा अध्यादेश रद्द केला असून ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करून त्यांच्या खात्यातील वीज कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली आहे. याबाबत मंत्रालयात ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या आणि इतर प्रश्‍नांवर सकारात्मक निर्णय न झाल्याने आता १ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली.
……
वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
ठाणे (वार्ताहर) : मित्रांसोबत घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका येथे एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या वृद्धाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. अजय रतनलाल गुप्ता असे त्यांचे नाव आहे. अपघातानंतर अजय यांना त्वरीत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
……
देवघरातील कापसाची गादी जळाली
ठाणे : तलावपाली जवळ, डॉ. मूस रोड येथील नौका विहार या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रूममधील एसी युनिटला आग लागल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या आगीत देवघरातील कापसाची गादी आणि पूजेचे काही साहित्य तसेच एसी पूर्णपणे जळून नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेत सुमारे अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
…..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT