crime esakal
मुंबई

Mumbai Crime News: पतीला जामिनावर बाहेर काढतो म्हणून सांगून फसवले, बनावट दस्तावेज प्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल

CD

अंधेरी, ता. २४ (बातमीदार) ः खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्‍या पत्‍नीला वकिलाने ९० हजार रुपये घेऊन जामिनाची बनावट आदेश पत्र आणि बनावट रक्कम भरलेली पावती देऊन फसवणूक केल्‍याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिरल जाधव याच्याविरोधात दहिसर पोलिसांनी फसवणुकीचा आणि बनावट दस्तावेज बनविण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी ईश्वरी नायडू (२६) या तक्रारदाराचे पती खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात बंदिस्त आहेत. त्यांना जामिनावर बाहेर काढण्यासाठी ईश्वरी नायडू प्रयत्न करीत होत्‍या. त्‍या चांगल्या वकिलाच्या शोधात असताना २०२२ मध्ये हिरल जाधव या वकिलाला भेटल्‍या. त्याने ईश्‍वरी यांच्‍याकडे पतीला जामिनावर बाहेर काढण्यासाठी ६० हजार रुपये लागतील, असे सांगितले. त्‍यामुळे ईश्‍वरी नायडू यांनी ही रक्कम दिली.

त्‍यानंतर हिरल जाधव यांनी त्‍यांना जामिनाची संबंधित कागदपत्रे दिली. तक्रारदार कारागृहात गेल्यानंतर संबंधित जामिनावरील सुटकेचे आदेश आणि रकमेची पावती बनावट असल्याचे समोर आले. त्‍यामुळे ईश्‍वरी नायडू यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चौकशीनंतर वकील हिरल जाधव याच्यावर दहिसर पोलिस ठाण्यात फसवणूक आणि बनावट दस्तावेज बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

IND vs NZ, Mumbai Test: भारतीय संघातून जसप्रीत बुमराह, तर न्यूझीलंड संघातून सँटेनर बाहेर; पाहा दोन्ही टीमच्या प्लेइंग-११

Google Fined: रशियाने गुगलला ठोठावला डॉलर 20,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000चा दंड

Aslam Sheikh Education: "आधी बारावी अन् मग नववी..." काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या शिक्षणावरुन गोंधळ; भाजपच्या आरोपामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT