मुंबई

पेपर फुटीप्रकरणी दोन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल

CD

मुंबई, ता. ३ : आझाद मैदान पोलिसांनी पेपरफुटीच्या आरोपात दक्षिण मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. वाणिज्य शाखेची तिसऱ्या वर्षाच्या सहामाही परीक्षा सुरू असताना ही घटना उघडकीस आली. शुक्रवारी परीक्षेदरम्यान अंश सनद हा विद्यार्थी मोबाईलवरून परीक्षेत कॉपी करताना सापडला. त्याच्या मोबाईलमध्ये संबंधित विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका आणि उत्तरे असल्याचे आढळले. ही प्रश्नपत्रिका दुसऱ्या परीक्षा केंद्रातील होती. त्याच्याकडे सापडलेल्या प्रश्नपत्रिकेवरील वॉटरमार्क क्रमांक हा त्यांच्या परीक्षा केंद्राचा नसून दुसऱ्या परीक्षा केंद्राचा होता. त्यानंतर अधिक तपास केला असता सनंदाचा मित्र सूरजने त्याला सकाळी ९.३७ वाजता व्हॉट्सअॅपवर ही प्रश्नपत्रिका पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सूरजलाही याप्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणत्याही विद्यार्थ्याला अटक करण्यात आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT