mumbai air pollution esakal
मुंबई

Mumbai Pollution : प्रदूषणात उल्हासनगरने मुंबईला टाकले मागे

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : हवेची गुणवत्ता खालावल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेस खडे बोल सुनावले आहेत. तरीही मुंबईसह उल्हासनगर आणि बदलापूर या शहरांतील प्रदूषणात वाढ झाल्याची बाबदेखील उघड झाली आहे. उल्हासनगरने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलादेखील मागे टाकले आहे. मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५० ते १७० असताना गेल्या पाच दिवसांत उल्हासनगर येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा २०० च्या वर असल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर आहे.

मुंबईतील हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेमुळे साऱ्यांचीच चिंता वाढली आहे. केंद्र सरकारचे पथक मुंबईतील हवेच्या गुणवत्तेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत दाखल होणार आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. मुंबईसह राज्यातील १७ शहरांमध्ये वायुप्रदूषणाचा धोका वाढला आहे.

यामध्ये ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि उल्हासनगर शहरांचा समावेश आहे. उच्च न्यायालयाने यासंबंधी खडे बोल सुनावल्यानंतर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना यासंबंधी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रदूषणाच्या बाबतीत उल्हासनगरने मुंबईलादेखील मागे टाकल्याचे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक यावरून दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील हवेची गुणवत्ता पातळी ही २०० च्या वर नोंदवली गेली आहे. प्रत्यक्षात शहरातील हवेचा निर्देशांक हा १०० च्या खाली असणे आवश्यक असताना तो दुपटीने आहे.

उल्हासनगर येथील हिराली फाऊंडेशनच्या अध्यक्षा वकील सरिता खानचंदानी यांनी याविषयी आवाज उठवला आहे. उल्हासनगर शहरात १ ते ५ नंबर कॅम्पमध्ये कोठेही जा, बांधकामे जोरात सुरू आहेत. त्यासोबत शहरात फटाक्यांचे बेकायदा स्टॉल आहेत.

उल्हासनगर येथे फटाक्यांची अधिकृत दुकाने असताना हे स्टॉल कशासाठी हवे आहेत. तसेच मध्यरात्रीपर्यंत हे स्टॉल शहरात सुरू असतात. याबाबत पालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना वारंवार पत्रव्यवहार करून कारवाई होत नसल्याचे सरिता यांनी सांगितले.

उपाययोजनाच नाही
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ आदी भागांत गृहसंकुलांची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून रस्त्यांची कामेदेखील सुरू आहेत. रस्त्यांचे सुरू असणारे सिमेंट काँक्रीटीकरण आणि त्यामुळे होणारे वायुप्रदूषण यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

फटाक्यांची बेकायदा विक्री
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची बेकायदा विक्री आणि त्यामुळे होणारे प्रदूषण याकडे लक्ष घालण्याचे सूचना पत्र ठाणे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका आयुक्त यांना पाठवले आहे. आता यावर पालिका स्तरावर काय उपाययोजना केल्या जातात हे पाहावे लागेल, असे सरिता खानचंदानी यांनी सांगितले.

मुंबईच्या मानाने उल्हासनगर शहर हे लहान आहे; मात्र येथे केवळ वायूच नाही, तर जलप्रदूषणाची समस्यादेखील मोठी आहे. प्रदूषणासंबंधी आम्ही खूप वर्षे लढा देत आहोत. मी स्वतः अस्थमा आजाराने त्रस्त आहे, गेली १३ वर्षे या आजाराला नियंत्रणात ठेवले होते; मात्र मागील वर्षापासून हा त्रास वाढत्या प्रदूषणामुळे बळावला आहे. पालिका स्तरावर प्रदूषण कमी करण्यासाठी माझी वसुंधरा, एनकॅप उपक्रम राबवले गेले; मात्र वाढते प्रदूषण हे उपक्रम फेल ठरल्याची ग्वाही देते.
- सरिता खानचंदानी, अध्यक्षा, हिराली फाऊंडेशन

हवेची गुणवत्ता निर्देशांक
दिनांक-उल्हासनगर (सिद्धीविनायक नगर)- बदलापूर (कात्रप)- कल्याण (खडकपाडा)
७ नोव्हेंबर- २३७-२१५-२२०
६ नोव्हेंबर-२८३-२५७-१७३
५ नोव्हेंबर-२५७-२७७-२०३
४ नोव्हेंबर-२२६-२३४-१५३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT