मुंबई, ता. १० ः टाळू आणि ओठांमध्ये विसंगती असलेल्या मुलांवर, बजाज फिन्सर्व्ह आणि स्माईल ट्रेन यांच्यातर्फे ‘महास्माईल्स क्लेफ्ट केअर फॉर एव्हरी चाइल्ड’ या उपक्रमांतर्गत उपचार केले जातील. स्माईल ट्रेन ही क्लेफ्ट केअर म्हणजेच टाळू किंवा ओठावरील विसंगती यासंदर्भात काम करणारी जगातील प्रमुख संस्था आहे.
या उपक्रमांतर्गत या समस्येने त्रासलेल्या मुलांची तपासणी करून त्यांना वेळीच उपचार उपलब्ध करून दिले जातील. बालआरोग्य हा बजाज फिन्सर्व्हच्या समाजोपयोगी कार्यक्रमांमधील प्रमुख उपक्रम असून याअंतर्गत त्यांनी मागील नऊ वर्षांत अशा साठ हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. आता या प्रकल्पाद्वारे राज्यातील आठ हजार बालकांना उपचार दिले जातील. भारतात दरवर्षी टाळू किंवा ओठावरील विसंगती असलेली पस्तीस हजार मुले जन्माला येतात. त्यापैकी अनेकांना अंधविश्वास, समाजातील गैरसमज किंवा आर्थिक अडचणींमुळे उपचार मिळत नाहीत. म्हणून या उपक्रमात अशी मुले शोधली जातील आणि त्यांच्यावर उपचार केले जातील. या उपक्रमात आरोग्य सेवक, समाजसेवक, स्वयंसेवी संस्था, वैद्यक व्यावसायिक आदींचा समावेश असेल, अशी माहिती बजाज फिन्सर्व्हच्या सीएसआर स्टीअरिंग कमिटीच्या अध्यक्ष शेफाली बजाज यांनी दिली. या उपक्रमातून चांगला बदल घडला तर हा उपक्रम इतर राज्यांमध्येही सुरू केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यासाठी १८००१०३८३०१ हा संपर्क क्रमांक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.