मुंबई

वांद्रे-वरळी सी लिंकवर तरुणाची आत्महत्या

CD

वांद्रे-वरळी सी-लिंकवरून
उडी घेत तरुणाची आत्महत्या
मुंबई, ता. १२ : मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून एका २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाश सिंग असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
आकाश मुंबईच्या परळ परिसरातील रहिवासी असून एका खासगी बँकेत नोकरीला होता. शुक्रवारी (ता. १०) तो टॅक्सीने कार्यालयातून घरी जात होता. सी-लिंकवरून जात असताना त्याने टॅक्सी थांबवली आणि पुलावरून थेट समुद्रात उडी घेतली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सहून परळला जाण्यासाठी टॅक्सी बुक केली. त्यानंतर त्याने चालकाला टॅक्सी वांद्रे-वरळी सी लिंकवर नेण्यास सांगितली. पुलावरून जात असताना आकाश मोबाईलवर बोलत होता. त्याने अचानक चालकाला टॅक्सीमधून मोबाईल बाहेर पडला असल्याचे सांगितले. त्यामुळे चालकाने सी-लिंकवर टॅक्सी थांबवली. त्यानंतर आकाशने टॅक्सीमधून खाली उतरत थेट समुद्रात उडी घेतली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT