सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मेंदूच्या गुंतागुंतीमुळे मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. कुलाबा येथील अक्षय अमित गुप्ता (वय ३०) यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याने पी. डी. हिंदुजा रुग्णालय अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या टीमने या कुटुंबाचे आभार व्यक्त केले. अक्षय गुप्ता यांना (ता. ६) उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी निःस्वार्थपणे त्यांचे अवयवदान करून त्यांच्या स्मृतीचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय तपासणी करत त्याचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले. या कृतीमुळे गरजू व्यक्तींचे प्राण वाचल्याचे समाधान गुप्ता कुटुंबीयांनी व्यक्त केले. या तरुणाच्या कुटुंबाच्या निर्णयामुळे मुंबईतील ४६ वे अवयवदान यशस्वी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.