सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. ८ : अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार हा भारतीय रेल्वेवरील ज्यांनी विविध श्रेणींमध्ये अनुकरणीय, उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण आणि प्रशंसनीय कामगिरी दाखवली आहे अशा १०० रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवषी प्रदान केला जातो. २०२३ साठी, मध्य रेल्वेच्या ७ जणांना प्रतिष्ठित ‘अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ज्यामध्ये तीन रेल्वे अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांच्या समावेश आहेत.
रेल्वे मंत्रालयाने नुकताच भारतीय रेल्वेत उत्कृष्ट काम करणाऱ्या शंभर रेल्वे कर्मचाऱ्यांना अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार जाहीर केला आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे तत्कालीन वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक डॉ. शिवराज पी. मानसपुरे, नागपूर विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ (वेल्डर) जयप्रकाश दिवांगण, मुंबई विभागाचे ट्रॅव्हेलिंग तिकीट निरीक्षक धर्मेंद्र कुमार, सुनील डी. नैनानी, सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभाग अभियंता संजय रामचंद्र पोळ, वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक विवेक एन. होके आणि पुणे विभागाचे विभागीय सिग्नल आणि दूरसंचार सुधांशू मित्तल यांना विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार जाहीर झाला. १५ डिसेंबर २०२३ रोजी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.