मुंबई

सानपाड्यात आंतरमहाविद्यालयीन ‘वुई ज्ञान’ विज्ञान महोत्सव

CD

सानपाडा, ता. १२ (बातमीदार) : ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीच्या सानपाडा कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या वतीने शनिवारी (ता. ९) आंतरमहाविद्यालयीन विज्ञान महोत्सव ‘वुई ज्ञान’चे आयोजन करण्यात आले होते. मानवी वर्तनाच्या पैलूंचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा आणि यातून त्यांना प्रेरणा मिळावी, असा या महोत्सवाचा उद्देश होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ. हैदर ए. करार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‍घाटन करण्यात आले. परिसरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थांनी या महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी इंग्रजी, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, माहिती आणि तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर प्रतिकृती तयार केल्या होत्या. या महोत्सवाला ओरिएंटल कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या डॉ. सुधा राठोड, अस्मिता व्यवहारे आणि डॉ. मतीन सय्यद मोईन उपस्थित होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ५०हून अधिक प्रतिकृती सादर केल्या. संयोजक स्वाती परब, पर्यवेक्षक शिल्पा नाईक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या वेळी संस्थेचे खजिनदार डॉ. अजीम जावेद खान यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सर्व खाजगी मालमत्ता ही भौतिक संसाधने नाहीत, सरकार अधिग्रहण करु शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार? मुंबई इंडियन्सच नव्हे, तर चार तगडे संघ बोली लावणार

Nashik Vidhan Sabha Election: विधानसभेत महायुतीला 175 जागा मिळणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत माहिती

Diwali Weekend Hotel Spike : शहर निघाले हॉटेलिंगला..! चार दिवसांत ३ ते ४ कोटींची उलाढाल, सुट्यांमध्ये गाठणार ९ कोटींचा टप्पा

Heena Gavit : भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा झटका! माजी खासदाराचा पक्षाला रामराम; विधानसभेच्या मैदानात अपक्ष लढणार

SCROLL FOR NEXT