KDMC sakal
मुंबई

KDMC: कल्याण - डोंबिवली अनधिकृत बांधकामांचे माहेरघर

सकाळ डिजिटल टीम

कल्याण, ता. १ (वार्ताहर) : महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत आहे; मात्र मागील दोन वर्षांच्या कालावधीत दहा प्रभाग क्षेत्र कार्यालयांच्या सहायक आयुक्तांनी केवळ १४० इमारती, ५४ चाळी, ८४५ रूम, ९५२ जोते, आठ मोबाईल टॉवर, ४१०४ शेड; तर ४३७३ टपऱ्या व हातगाड्यांवर तोडक कारवाई केली आहे. तसेच अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ४७२३ जणांना नोटिसा बजावल्या आहेत; तर ५९४ अनधिकृत बांधकामे घोषित करत आतापर्यंत ९१ धोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ९५ भूमाफियांवर एमआरटीपीनुसार पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिसरात अनधिकृत बांधकामांनी उच्चांक नोंदवला आहे. पालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त तथा प्रशासक डॉ. इंदुराणी जाखड प्रत्यक्षात प्रभागात फिरत असताना त्यांनाही अनधिकृत बांधकामांच्या परिसीमेचा अंदाज आला आहे. पालिकेच्या दहा प्रभाग क्षेत्रांत सटरफटर कारवाई केल्याचे दोन वर्षांच्या दिलेल्या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येत आहे.


वाढत्या अनधिकृत बांधकामामुळे भूमाफियांनी पालिकेच्या आरक्षित जागेवरही इमारती व चाळी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांचे माहेरघर असा शिक्का कल्याण-डोंबिवलीला लावला गेला आहे. पालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनीही अनधिकृत बांधकामांबाबत गय करणार नसल्याच्या वल्गना केल्या; मात्र आजही शेकडोंच्या संख्येने बांधकामे शहरात उभी राहिल्याचे दिसून येत आहे.

राज्य शासनाने प्रतिनियुक्तीवर पाठवलेल्या कल्याण-डोंबिवलीतील पाच सहायक आयुक्तांनी ५७३ जोते, तेरा इमारती, आठ चाळी, तसेच शेड आणि टपऱ्या व हातगाड्यांवर सर्वाधिक कारवाई केल्याचे दिसून येत आहे. अ प्रभागात १०१२ बांधकामांना नोटीस; तर ६८ अनधिकृत बांधकामे घोषित करत एमआरटीपीचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

क प्रभाग क्षेत्रात २७६ बांधकामांना नोटीस; तर तेरा बांधकामे अनधिकृत घोषित करीत दोन एमआरटीपीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ड प्रभागात एमआरटीपीअंतर्गत एकही गुन्हा दाखल नाही; मात्र ९८ जणांना नोटीस बजावत १०२ अनधिकृत बांधकामे घोषित केली आहेत. ह प्रभागात ४० सर्वाधिक एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल असून पन्नास जणांना नोटीस; तर ४२ अनधिकृत बांधकामे घोषित करण्यात आली आहेत. ग प्रभागात सर्वांत जास्त १४६७ बांधकामांना नोटीस देण्यात आली असून सात बांधकामे अनधिकृत म्हणून जाहीर केली असून एमआरटीपीअंतर्गत केवळ तीन गुन्हे दाखल केले आहेत.

ब प्रभागात एकही गुन्हा दाखल नाही
ब प्रभागात एकही एमआरटीपी दाखल नसून ९९४ बांधकामांना नोटीस; तर पंधरा बांधकामे अनधिकृत घोषित केली आहेत. जे प्रभागात ४४२ नोटीस; तर ५८ अनधिकृत बांधकामे जाहीर करीत येथे एक एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ प्रभाग कार्यालय क्षेत्रात एमआरटीपीचे पाच गुन्हे; तर ६१ नोटीस व १५५ बांधकामे अनधिकृत असल्याचे घोषित केले आहे.

३४ भूमाफियांवर गुन्हे दाखल
आय प्रभाग क्षेत्रात सात एमआरटीपी व २३६ कामांना नोटीस तसेच ५८ बांधकामे अनधिकृत म्हणून जाहीर केली असून ई प्रभागांत ३४ भूमाफियांवर एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. ८७ जणांना नोटीस; तर ७६ बांधकामे पालिकेने अनधिकृत घोषित केल्याची माहिती अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने या वेळी दिली. पालिकेच्या दहा प्रभागांत एमआरटीपीचे दोन वर्षांच्या कालावधीत केवळ ९५ गुन्हे दाखल झाले असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT