मुंबई

रिक्षा चालकांना दोन रुपये भाडेवाढ; अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा

CD

मुंबई : मुंबई रिक्षामेन्स युनियनने उपनगरात चालणाऱ्या ऑटोरिक्षांच्या मूळ भाड्यात दोन रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्याचे मूळ भाडे २३ रुपये असून मुंबईमध्ये २२ ऑक्टोबर २२ पासून रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाडेदरात वाढ झाली नाही. त्यामुळे भाडेवाढ करा; अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा मुंबई रिक्षामेन्स युनियनने दिला आहे. युनियनचे नेते थॅम्पी कुरियन यांनी सांगितले की, त्यांची ही नवीन भाडेवाढ करण्याची विनंती वाढत्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित आहे. दोन रुपये भाडे करण्यासाठी सर्व नियम आणि घटक यांचा विचार केला आहे. यामध्ये सध्याच्या राहणीमानाचा खर्च, दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च, भांडवली खर्च, विमा आणि कर आणि मुंबईत वाहन चालवण्याचा इंधन खर्च यांचा समावेश आहे. भाडेवाढीसाठी आम्ही प्रशासनाला डिसेंबरची मुदत देऊनही भाडेवाढ झाली नाही. त्यामुळे राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात जाऊ, असे कुरियन म्हणाले.

अर्धवट कामामुळे स्थानिक हैराण
कांदिवली (बातमीदार) : हनुमान चाळीतील गटाराच्या नूतनीकरणाचे काम पालिकेने सुरू केले आहे. यात खोदकामात काढण्यात आलेला राडारोडा गल्लीबोळात आणि नाक्यावर टाकण्यात आला आहे. सध्या हे काम बंद असल्याने टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे स्थानिकांना, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी अनुदत्त विद्यालय असून परिसरातील अनेक विद्यार्थी जवळचा मार्ग म्हणून याच गल्लीचा वापर करतात. मात्र खोदून ठेवलेल्या गटारामुळे विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
…..
ईशान्य मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी योगेश मांजरेकर
मुलुंड (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई ओबीसी जिल्हाध्यक्षपदी मुलुंडच्या योगेश मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या मान्यतेने आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ओबीसी राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांनी मुंबईत संघटनात्मक वाढीसाठी ही नियुक्ती केली आहे. यावेळी मांजरेकर पुढे म्हणाले की, माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीचे मी पालन करीन. तसेच ओबीसी संघटनेची पाळेमुळे प्रबोधनातून आणि जनजागृतीच्या माध्यमातून मुंबईच्या प्रत्येक वॉर्डापर्यंत पोहचवण्यासाठी काम करणार आहे.
…..
ग्रंथालय सहायक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण

घाटकोपर (बातमीदार) : हिंदी विद्या प्रचार समितीच्या रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे एक आठवड्याच्या राष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. शुभांगी वेदक यांनी सातत्याने १५ वर्षे हा उपक्रम राबविला आहे. शैक्षणिक ग्रंथालयामधील उदयोन्मुख व बदलते प्रवाह आणि तंत्रज्ञान यांची ओळख करून देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य विषय होता. ग्रंथालय शास्त्रातील तज्ज्ञ डॉ. राजेंद्र कुंभार यांचे बीजभाषण यावेळी झाले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. उषा मुकुंदन तसेच प्राचार्य डॉ. हिमांशू दावडा यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाची सांगता ही आयआयटी, दिल्ली येथील ग्रंथपाल डॉ. नबी हसन यांच्या मार्गदर्शक भाषणाने करण्यात आली.
…..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT